Water Crisis
Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घट

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : समाधानकारक किंवा चांगला पाऊस झाला की एरवी डिसेंबरमध्ये फारसे न आटणाऱ्या पाणीसाठ्यांना उतरती कळा लागली आहे. नुकतीच केंद्रीय पथकाने दुष्काळ पाहणी केली. त्यातही जालना जिल्ह्यातील काही कोरड्या पडलेल्या प्रकल्पांनी ती बाब केंद्रीय पथकालाही अधोरेखित केली आहे.

मराठवाड्यातील सर्व ८७७ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ४२.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांतील ४९.८६ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पांतील २६.३ टक्के, ७४९ लघू प्रकल्पातील २७.२२ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ५१.७५ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये असलेल्या ४४.७० टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

मध्यम ७५ प्रकल्पांपैकी बीड व धाराशिवमधील प्रत्येकी १, तर लघू ७५० प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील ९, बीडमधील १४, लातूरमधील ४ व धाराशिवमधील सर्वाधिक २३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. १८० लघू प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ५८ लघू प्रकल्पांत २५ ते ५० टक्के दरम्यान, ६० लघू प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के दरम्यान, तर १२७ लघू प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांपैकी २२ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, १३ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, सहा प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर केवळ १० प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील सदस्य डॉ. ए. एल. वाघमारे व हरीश उंबरजे या दोघांनाही छत्रपती संभाजीनगर, भोकरदन व अंबड तालुक्यांतील प्रकल्पात नसलेल्या पाण्याच्या थेंबाने पाणी संकट किती गंभीर उभे राहू पाहते आहे याचे दर्शन घडविले.

पथकातील सदस्य ही ग्रामस्थ व शेतकऱ्यांची चर्चा करताना पाण्याच्या संकटाची गंभीरता नेमकी किती हे जाणून घेत असल्याचे दिसले.

खरिपात पेरलेली पीक पावसाअभावी गेली. तीन-चार वर्षांनंतर मराठवाड्यातील खरिपांवर दुष्काळाचे सावट ठरलेले आहे. अति पावसाने खरिपातील पीक गेली तर पर्याय उरत नाही. परंतु पाण्याशिवाय पीक नाही हे ओळखून पिकांना गरजेनुसार पाऊस न पडल्यास पीक जाणे किंवा उत्पादनात मोठी घट येणे रोखण्यासाठी खरिपातील पिकांना गरजेचे वेळी किमान एक, दोन किंवा तीन पाणी देण्यासाठी पाहणी करणाऱ्या समित्या काही उपाय सुचवितील का हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

२९७ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील एकूण ७५ माध्यम प्रकल्पांपैकी २२ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २, जालन्यातील ३, बीडमधील ६, लातूरमधील ३, धाराशिवमधील ७ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

दुसरीकडे ७५० लघू प्रकल्पांपैकी तब्बल २७५ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २७, जालन्यातील ४४, बीडमधील ५५, लातूरमधील ४२, नांदेडमधील १, परभणीतील ८ व धाराशिवमधील सर्वाधिक ९८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology : शेतीमाल वाहतुकीसाठी दुचाकीची ट्रॉली

Goat Care: पावसाळ्यात शेळ्यांची 'अशी' काळजी घ्या

Turmeric Cultivation : हळद लागवडीचे व्यवस्थापन

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेत मोठे बदल; अर्जासाठी मुदत वाढ

Maharashtra Assembly Session : 'स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी', विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT