Raju Shetti  Agrowon
ॲग्रो विशेष

Ratnagiri-Nagpur Highway : मोजणी अधिकारी-शेतकऱ्यांत संघर्षाची चिन्हे

Raju Shetti : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी उदगाव-चोकाक दरम्यान जमीन मोजणीसाठी अधिकारी येणार आहेत. दोन-चार जणांचे तरी पाय मोडले पाहिजेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी उदगाव-चोकाक दरम्यान जमीन मोजणीसाठी अधिकारी येणार आहेत. दोन-चार जणांचे तरी पाय मोडले पाहिजेत. काय होईल, ३५३ चा गुन्हा दाखल होईल. पण याला जामीन मिळतो.

दोन-चार दिवस आत राहिले तरी काही बिघडत नाही. असे गुन्हे दाखल होतील त्यांची जामीन मिळाल्यावर गावातून डॉल्बी लावून मिरवणूक काढू. येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याची तयारी ठेवा, असा सूचक इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील उदगाव-चोकाक बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी व होणारा मार्ग उदगाव बायपास महामार्गावरून न्यावा या मागणीसाठी दहा गावातील बाधित शेतकऱ्यांकडून विविध आंदोलने केली जात आहेत.

कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी जैनापूर (ता. शिरोळ) येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण श्री. शेट्टी यांच्या विनंतीवरून शनिवारी (ता. १५) पाचव्या दिवशी रात्री उशिरा मागे घेतले. यापुढे आंदोलन अधिक तीव्र गतीने सुरू ठेवण्याचा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला.

शनिवारी रात्री उशिरा श्री. शेट्टी यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देताना अधिकाऱ्यांचे पाय मोडा असा आदेश शेतकऱ्यांना दिल्याने मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांना आवाहन करताना शेट्टी यांनी, उपोषण सोडा, आंदोलन सोडायचे नाही.

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सरकारशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. तुमच्या रक्तात शेतकऱ्यांचा डीएनए असेल तर क्रांती करून दाखवा. नाहीतर देतील तितके पैसे स्वीकारा आणि गप्प बसा. येणाऱ्या काळात याप्रश्नी आंदोलन तीव्र करताना मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचे पाय मोडा, असा इशारा दिल्याने संघर्षाची चिन्हे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Processing Industry: प्रक्रिया उद्योगातून महिला समूहाची आघाडी

Weekly Weather: किमान व कमाल तापमानातील घसरण कायम

Sahyadri Tiger Reserve: विदर्भातील ‘चंदा’ वाघीण सह्याद्री प्रकल्पात दाखल

Papaya Rate: पपई दराचा खानदेशात तिढा

Farmer Death: मराठवाड्यात ३०० दिवसांत ८९९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

SCROLL FOR NEXT