Pune News: कोयनेच्या खोऱ्यातील वाघांची संख्या वाढविण्यासाठी विदर्भातील ‘ताडोबा’ व ‘पेंच’ व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ आता ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’त सोडले जाणार आहेत. या उपक्रमाला वन खात्याने ‘ऑपरेशन तारा’ असे नाव दिले आहे. यातील पहिली ‘चंदा’ वाघीण (टी २०-एस-२) गुरुवारी मध्यरात्री सह्याद्रीच्या चांदोली भागात बंदिस्त पिंजऱ्यातून दाखल झाली. .सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील व बाबासाहेब हाके, वनक्षेत्रपाल ऋषीकेश पाटील, प्रदीप कोकितकर, किरण माने, संग्राम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, आकाश पाटील या मोहिमेत सहभागी झाले होते..Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू.‘‘चंदा’चे नवे नाव आता ‘तारा’ असणार आहे. तिला सध्या सुरक्षित स्थळी मोकळे सोडले असून, निरीक्षणाअंती ताराला लवकरच मुक्त जंगलात सोडले जाणार आहे. विदर्भातील वाघ सुरक्षेचे सारे मानदंड पाळूनच सह्याद्रीत आणले जात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण, अधिवास सुधारणा व शास्त्रोक्त उपाय करीत आहोत,’’ असा दावा श्री.चव्हाण यांनी केला आहे..Chandrapur Tigers: चंद्रपूर होणार ‘वाघांची राजधानी.सह्याद्री प्रकल्पात ‘सेनापती’, ‘सुभेदार’ व ‘बाजी’ असे तीन वाघ आहेत. नवे आठ वाघ आल्यानंतर काही वर्षात संख्या वाढेल. यातून कोयनेच्या खोऱ्यात ‘मानव-वाघ संघर्ष’ उभा राहील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. परंतु, वन विभागाने ही भीती निराधार असल्याचे म्हटले आहे. ‘‘मुळात, सह्याद्री प्रकल्पाचे सध्याचे जंगल किमान ५० वाघ सामावून घेण्याच्या क्षमतेचे आहे. त्यामुळे सध्याची वाघांची संख्या वाढवली तरी समस्या उद्भवतील, असे वाटत नाही,’’ असा युक्तिवाद वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने केला आहे..वन्यजीव अभ्यासकांनी वन विभागाच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. ‘‘सह्याद्रीतील वाघ मुख्यत्वे कोयनेच्या खोऱ्यातून दक्षिणेकडे म्हणजेच कर्नाटकच्या वनक्षेत्रात भ्रमण करणे पसंत करतात. एकट्या कर्नाटकात साडेपाचशेहून अधिक वाघ उपकरणारावर (कॅमेरा ट्रॅपिंग सेन्सस) आधारित गणनेत आढळले आहेत. केरळात सध्या २०० हून अधिक; तर तमिळनाडूत ३०० वाघ आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.