Shaktipeeth Express : शक्तिपीठ महामार्गावरून राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये सरकार विरुद्ध शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून दोन्ही नियोजित शक्तिपीठ महामार्ग आणि नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचा नकाशा टाकून दोन्हीतल्या अंतराची माहिती समोर आणली आहे.
सोशल मिडियावरील पोस्टमध्ये शेट्टी म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेवर ८६ हजार कोटींचा बोजा टाकणारा शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर या महामार्गास समांतर आहे. या दोन्ही महामार्गातील कमीत कमी अंतर २ किलोमीटर व जास्तीत जास्त ३० किलोमीटर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणारे महामार्ग कसे समांतर आहेत, हे या नकाशावरून दिसून येईल."
या महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तसेच विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी आवाज उठवला आहे. कृषीदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केली. परंतु राज्य सरकार मात्र महामार्गावर ठाम आहे. विशेष म्हणजे समांतर महामार्ग अस्तित्वात असूनही राज्य सरकारला शक्तिपीठचा अट्टहास करत आहे. यावरूनच शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे.
शेट्टी पुढे म्हणाले, "भविष्यात गरज पडल्यास सध्या असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीऐवजी सहा किंवा आठ पदरी करणं सहज शक्य असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी? ५० हजार कोटींचा ढपला करण्यासाठीच." असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धार्मिक स्थळांच्या विकासासह मराठवाडा आणि विदर्भाचा कायापालट शक्तिपीठ महामार्गामुळे होईल, असा दावा करत आहे. परंतु शक्तिपीठला समांतर रत्नागिरी-नागपूर महामार्ग असूनही शक्तिपीठचा अट्टहास राज्य सरकारकडून केला जात आहे. त्यावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप आणि घणाघाती टिका विरोधक करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.