NHRDF Farmer Training  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Farming Training : राजस्थानच्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाचे धडे

NHRDF Chitegaon : ‘एनएचआरडीएफ’ने चार दशकांत कांदा, लसूण व भाजीपाला पिकात संशोधन केले आहे याच अनुषंगाने चितेगाव येथील शेतकरी प्रशिक्षण सभागृहात कांदा पिक संबंधी शास्त्रीय माहिती देण्यात आली.

Team Agrowon

Nashik News : राजस्थानमधील शेतकऱ्यांना कांदा व लसूण उत्पादनाच्या संधी अवगत होण्यासाठी उत्पादन तंत्र समजण्यासाठी ‘कांदा व लसूण उत्पादन आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर राजस्थान येथील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

उदयपूर (राजस्थान) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यामार्फत पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान(एनएचआरडीएफ)च्या चितेगाव (ता.निफाड) येथील विभागीय संशोधन केंद्र येथे घेण्यात आला. उदयपूर येथून आलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी कांदा व लसूण उत्पादनाचे धडे गिरवले.

‘एनएचआरडीएफ’ने चार दशकांत कांदा, लसूण व भाजीपाला पिकात संशोधन केले आहे याच अनुषंगाने चितेगाव येथील शेतकरी प्रशिक्षण सभागृहात कांदा पिक संबंधी शास्त्रीय माहिती देण्यात आली. ‘एनएचआरडीएफ’चे सहाय्यक संचालक व वनस्पती रोग शास्त्र विभागाचे डॉ. आर. सी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राजस्थान सरकारच्या झालारा पंचायत समितीचे सहाय्यक कृषी अधिकारी सुरेश नाथ गेहलोत, कृषी पर्यवेक्षक नटवरलाल अहारी, कुराबाड पंचायत समिती येथील सहाय्यक कृषी अधिकारी भरत नंदन लोहार, गिर्वा पंचायत समितीचे कृषी पर्यवेक्षक सौरन सिंह जाट आदी कृषी विभागाचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांसमवेत उपस्थित होते.

प्रशिक्षण कार्यक्रमात ‘मातीचे आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर मृदा तज्ञ अनंत बनसोडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाच दिवसाच्या प्रशिक्षण काळात संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.जास्ती श्रीवर्षा, अशोक टेलर, मनोज पांडेय, डॉ.नितीश शर्मा, बी.पी.रायते, संदीप लवांड यांच्याकडून कांदा पिकाच्या विविध क्षेत्रांवर जसे, कांद्याच्या सुधारित जाती,

लागवडीतील यांत्रिकीकरण विशेषतः ट्रॅक्टर चलित कांदा लागवड यंत्र, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, कांदा पिकाचे सिंचन, खत आणि तण व्यवस्थापन तसेच कांदा साठवण व गुणवत्ता सुधारण्यासाठी काढणी नंतरच्या पद्धती व आधुनिक पद्धतीने साठवण करून कांदा पिकाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन व साठवणूक या सर्व विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT