Onion Cultivation: रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड

Onion Farming: राज्यात यंदा रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याच्या लागवडीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यात तब्बल ६.५१ लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत १.८७ लाख हेक्टरने वाढ झाली आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यभर रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याचे सरासरी क्षेत्र ४.५ लाख हेक्टर असते. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यभरात ६.५१ लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनी रब्बी कांदा लागवडीला मोठी पसंती दिल्याने आजवरचे लागवडीचे उच्चांक यंदा मोडीत निघाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १ लाख ८७ हजार हेक्टरवर कांदा लागवडी जास्त आहेत.समाधानकारक पाऊस, मागील वर्षी उन्हाळ कांद्याला मिळालेले दर हे लागवड वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

राज्यातील सर्वाधिक कांदा लागवडी नाशिक विभागात आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा तिसरा क्रमांक आहे. त्यानंतर अमरावती, लातूर, कोल्हापूर विभागांत लागवडी वाढत आहेत. तर कमी अधिक प्रमाणावर नागपूर व कोकण विभागातही लागवडी झालेल्या आहेत. राज्यात सर्वाधिक कांदा लागवडी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे, सोलापूर, धाराशिव, बुलडाणा, सातारा जिल्ह्यांत आहेत. तर रत्नागिरी व गोंदिया वगळता सर्वच जिल्ह्यांत कमी अधिक कांदा लागवडी झालेल्या आहेत.

Onion Cultivation
NAFED Onion Procurement : ‘नाफेड’मुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची आर्थिक कोंडी

यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यांत सुरू झालेल्या लागवडी फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहापर्यंत सुरूच होत्या. टप्प्याटप्प्याने या लागवडी होऊन विक्रमी लागवडीचा आकडा समोर आला आहे. मागीलवर्षी अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने कांदा लागवडी तुलनेत कमी होत्या. परिणामी जून महिन्यात कांदा दरात सुधारणा होऊन नोव्हेंबर महिन्यात ५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह असल्याने पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्यानंतर दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या आहेत.

लागवडी वाढल्या, उत्पादन ठरणार महत्त्वाचे यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के कांदा लागवडी अधिक आहेत. मात्र लागवडी उशिराने झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा लागवड खर्चात १० ते १५ टक्क्यांपर्यंत खर्च वाढला आहे.तर अनेक भागात कांदा पिकावर करपा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने पीक संरक्षण खर्चही वाढला. त्यात तापमानवाढीचा परिणाम आहे. त्यामुळे लागवडी वाढल्या मात्र उत्पादन महत्त्वाचे ठरणार आहे.त्यानुसार आगामी काळात उत्पादकता, मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतील. कांदा धोरण स्थिर राहिल्यास व निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांचा उत्पन्नवाढीला मदत होणार आहे.

Onion Cultivation
Onion Harvesting : खानदेशात कांदा, मका, गव्हाची कापणी वेगात

राज्यातील गेल्या तीन वर्षांतील लागवड स्थिती

विभाग...२०२२–२३...२०२३–२४...२०२४–२५

कोकण...६०७.५१...५६४.९०...४९९.५५

नाशिक...२,४८,४१७.५२...१,६७,२८५.५४...२,९०,१३६.२२

पुणे...२,०७,४७४.२४...२,०६,५९५.४६...२,३२,१५८.१२

कोल्हापूर...१०,५२१.२०...८,०३७.१०...१०,७

९०.८५

छत्रपती संभाजीनगर...५३,८०९.१०...५२,७३९.००...७९,३८६.७३

लातूर...१०,००३.८०...१०,५१०.६८...१३,०३४.१०

अमरावती...२२,३७१.६५...१८,१८७.७३...२४,८१३.८०

नागपूर...७.००...९६४.३५...१,१४६.४५

एकूण लागवडी...५,५३,२१२.०२...४,६४,८८४.७६...६,५१,९६५.८२

लागवडी वाढण्याची प्रमुख कारणे

- कांदा काढणीपश्चात जूनपासून पुढे दरात सुधारणा.

- पाऊस समाधानकारक झाल्याने सिंचनाची सुविधा.

- कांदा बियाणे मुबलक प्रमाणावर उपलब्ध.

- सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे कांदा लागवडीला प्राधान्य.

- विद्राव्य व फवारणी पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे सोपे.

लागवडी उशिरापर्यंत झाल्याने उत्पादकता महत्त्वाची राहील. त्यामुळे कांदा काढणी पश्चात साठवणूक व्यवस्था यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतकरी व संबंधित घटकांना लाभ होईल असे स्थिर धोरण असावे.
डॉ. सतीश भोंडे, माजी अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान(एनएचआरडीएफ)
रब्बी उन्हाळ कांद्याचे दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.जानेवारीपर्यंत लागवडीचा वेग राहिला. मात्र उशिरा लागवडीमध्ये उत्पादन किती येईल हे महत्त्वाचे आहे. मात्र लागवडी उशिराने झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.सध्या कांदा निर्यातीवर निर्बंध नाहीत त्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आल्यास दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
डॉ. राजीव काळे, शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधनालय, राजगुरूनगर (पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com