MSP  Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Hike : आत्महत्या थांबण्यासाठी हमीभाव किंमत वाढविण्याची मागणी

Farmers Death Control : महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. शेतीमालाला पुरेसा दर मिळत नसल्यानेच आत्महत्या होत आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. शेतीमालाला पुरेसा दर मिळत नसल्यानेच आत्महत्या होत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी शेतीमालाची किमान हमीभाव किंमत वाढवून त्याला कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय पॉल शर्मा यांच्याकडे केली आहे. या वेळी राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शेतकरी संघटनेचे नेते अॅड. अजित काळे, डॉ. अशोक ढगे, ऋषभ तलवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. विजय पॉल शर्मा यांची भेट घेऊन शेतकरी आत्महत्या, शेतीमालाचे दर आणि अन्यबाबीवर चर्चा केली.

महाराष्ट्रात दररोज सरासरी नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या होत आहेत. दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येबाबत फारसे गांभिर्याने घेतले जात नाही. शेतकरी आत्महत्येच्या यासंदर्भात कारण मीमांसा व उपाययोजना करणे आवश्यक असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत.

शेतीमालाला पुरेसा दर मिळत नसल्याने व उत्पादन खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवून त्याला कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी डॉ. शर्मा यांच्याकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT