Orange Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop Damage :संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

Orange Crop : शेतकऱ्यांची तहसीलदारांमार्फत शासनाकडे मागणी

Team Agrowon

Washim News : वाशीम ः मानोरा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई दिली जावी, अशी मागणी या तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन दिले.

वाशीम जिल्ह्यातील ७०० ते ८०० संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाकडे ४ सप्टेंबरला मृग बहराच्या नुकसानीबाबत कळवलेले आहे. जास्त पाऊस झाल्याने यंदा संत्रा उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही अद्याप मानोरा तहसील कार्यालय, कृषी विभागाने कुठलेही पंचनामे केलेले नाहीत.

संत्रा उत्पादकांचे कुठलेही नुकसान झालेले नाही, असा अहवाल देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या निवेदनात केला आहे. निरंक अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून सरसकट नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणीही केली आहे. श्‍याम इंगळे, मुकेश काळे, विशाल ठाकरे, हेमंत देशमुख, मनीष गावंडे, गोपाल म्हातारमारे, गोपाल ठाकूर, गजानन इंगोले, प्रमोद अढाव, गजानन अढाव, अरविंद पाटील, पंडीत जाधव, मनीष पवार यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT