Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा ज्वर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात कायम आहे.
Orange
Orange Agrowon

Amaravati News : लोकसभा निवडणुकीचा ज्वर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात कायम आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात गारपीट, अवकाळी पावसाने ग्रस्त संत्रा बागायतदारांचे प्रश्‍न त्यांच्याकडून दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप होत आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात असून, वरुड, मोर्शी हे तालुके त्यामुळेच विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात.

या दोन तालुक्‍यांसोबतच जिल्ह्याच्या इतर भागांतही संत्रा लागवड आहे. परंतु संत्रा बागायतदारांचे हित जोपासण्यासाठी कोणत्याच उपाययोजना, प्रक्रिया उद्योगाला बळ दिल्या जात नसल्याने या भागातील संत्रा बागायतदार पुरता जेरीस आला आहे. बांगलादेश हा नागपुरी संत्र्याचा सर्वांत मोठा आयातदार होता. परंतु बांगलादेशने गेल्या चार वर्षांपासून आयात शुल्कात वाढीचे धोरण अवलंबिले आहे.

Orange
Orange Farming : आंबिया बहरातील उत्पादनावर भर

या वर्षी प्रति किलो ६६ रुपये आयात शुल्काची आकारणी बांगलादेशकडून केली जात आहे. त्याच्याच परिणामी भारतातून होणारी निर्यात प्रभावित झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठेतच मालाची विक्री करावी लागली. त्याचा परिणाम दरावर झाला. हे संकट कमी होते की काय? तापमानातील वाढ आणि त्यानंतरचा अवकाळी पाऊस याचाही फटका हंगामाला बसला.

Orange
Orange Orchard : संत्रा पट्ट्यात बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची भीती

यामुळे काही भागांत फुल तर काही भागात फळगळती झाली. चांदूरबाजार तालुक्‍यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधीक प्रभावित झाले. परंतु त्यांची दखल लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनिक पातळीवर अपेक्षित प्रमाणात घेण्यात आली नाही. त्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे.

पंचनामा अहवाल शासनाकडे पाठविल्याचे खास पठडीतील उत्तर प्रशासनाकडून या पार्श्‍वभूमीवर दिली जात असले तरी भरपाईबाबत त्यांनी चुप्पी साधली आहे. विमा भरपाईच्या बाबतही स्पष्टता नसल्याने त्या मदतीपासूनही शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र आहे.

विमा कंपनीकडून विमा हप्त्यात मोठी वाढ करण्यात आली असली, तरी भरपाईबाबत मात्र उदासीन धोरण राबविले जाते. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
- संदीप ढोले, संत्रा बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com