ॲग्रो विशेष

Rain Update : मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. रविवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत यवतमाळमधील घारफळ ९५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले. तर जोरदार पावसामुळे ओढ्या नाल्याच्या पाणीपातळीत वाढ झाली.

कोकणात अधूनमधून शिडकावा होत आहे. रायगडमधील माणगाव येथे २७ मिलिमीटर, रत्नागिरीतील सौंदळ येथे ५९ मिलिमीटर, तर चिपळूण, खेर्डी, मार्गताम्हाणे, रामपूर, भरणे, दाभीळ, धामणंद, पाचल येथे हलक्या सरी बरसल्या. घाटमाथ्यावर उघडीप होती. खानदेशात काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी जळगावमधील नसिराबाद, किनगाव, साकळी, धानोरा, चोपडा येथे तुरळक सरी बरसल्या.

मध्य महाराष्ट्रात ऊन व ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. नाशिकमधील विंचूर येथे ३८ मिलिमीटर, तर देवगाव, नांदूर, रानवड, लासलगाव, वडाळी, नगरमधील पारनेर, निघोज, कुंभळी, मिरजगाव, पुण्यातील माळेगाव, पणदरे, उंडवडी येथे हलका पाऊस झाला. सोलापुरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर हातीद येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला.

त्यामुळे काढणी केलेले शेतमाल झाकण्यासाठी धावपळ झाली. साताऱ्यातील मायणी येथे ५७ मिलिमीटर, तर सांगलीत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. वायफळे, करंजे येथे ७९ मिलिमीटर, सावळज येथे ७७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे शेतात चांगलेच पाणी साचले होते. कोल्हापुरातील वाडी-रत्नागिरी येथे ३४ मिलिमीटर, तर निगवे, हातकणंगले, कबनूर, हेर्ले, हुपरी, शिरोळ, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर, शिरढोण, कुरुंदवाड, पन्हाळा येथे हलका पाऊस झाला.

मराठवाड्यातील बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर तर धाराशिव, नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक होते. बीडमधील जातेगाव येथे ४८ मिलिमीटर, तर दिदरूड ३४, सिरसाळा ३८, चौसाळा ३१ मिलिमीटर, तर लातूरमधील कासार बालकुंड येथे ३८ मिलिमीटर, तर लामजना ३४, किल्लारी ३५, अहमदपूर, किनगाव, आंधोरी, औराद, शेलगाव ३० मिलिमीटर पाऊस पडला.

धाराशिवमधील बेंबळी, पडोली ५९ मिलिमीटर, नांदेडमधील कंधार येथे ६३ मिलिमीटर, परभणीतील रावराजूर येथे ५५ मिलिमीटर, तर हिंगोलीतील आखाडा बाळापूर येथे ६८ मिलिमीटर, तर हट्टा ३६, कुरुंदा ४६ मिलिमीटर पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडीसह परिसरातील पिंपळवाडी पिराची, धनगांवसह परिसरात रविवारी दुपारी तीन ते सव्वाचार वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला. शेतात पाणी साचल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिसरात सातत्याने दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे.

विदर्भात कमीअधिक प्रमाणात पाऊस पडला. यात बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम सरी बरसल्या. तर वाशीम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात जोर अधिक होते. अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला.

बुलडाण्यातील अंजनी येथे ४४ मिलिमीटर, तर डोणगाव, लोणी ३९, मेहकर ३१ मिलिमीटर, अमरावतीतील साटेफळा येथे ३० मिलिमीटर, नागपुरातील लाखनी येथे ४२ मिलिमीटर, भंडाऱ्यांतील आमगाव येथे ५९ मिलिमीटर, तर तिगाव ३७ मिलिमीटर, गडचिरोलीतील मासेळी येथे ३२ मिलिमीटर, मुलचेरा ३५ मिलिमीटर, वाशीमधील मालेगाव येथे ८२ मिलिमीटर, शिरपूर, करंजी ७९ मिलिमीटर, यवतमाळमधील वायफड येथे ६६ मिलिमीटर पाऊस झाला.

रविवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत-कृषी विभाग)

मध्य महाराष्ट्र : आगळगाव ४१, वैराग ४०, उपळाई ३८, नारी ४०, सुर्डी ३५, दारफळ ३६, जेऊर, उमरड ३८, नाझरेा ६२, कुमठे ३५, निमसोड ३९, कातरखटाव ३१, कवलापूर ४६, बेडग ३९, भोसे ३४, संख ३५, उमदी, तिकोंडी ३४, कामेरी ७०, मांजर्डे ६३, विसापूर ३४, मनेराजुरी ५१, तासगाव ४३, खरसुंडी ५०, आटपाडी ३६, ढालगाव ६१, देशिंग ३४, कुची ६३, कवठेमहांकाळ, हिंगणगाव ४२.

मराठवाडा : मंगरूळ ३८, भूम ५८, वालवड ४५, लेत ४३, पारगाव ५६, कुंडलवाडी ४२, जाहूर ५४, चांडोळा ४२, कुरूळा ४४, पेठवडज ३७, उस्माननगर ३८, बारूळ ३७, माळाकोळी ५५, कलंबर ४७, पिंपरखेड ४०, वाई ४३, पिंगळी, परभणी ग्रामीण ३७, गंगाखेड ३८, माखणी ५०, राणीसावरगाव ३८, पार्थी ३०, पूर्णा ४१, ताडकळस ४६, कात्नेश्‍वर ५४.

विदर्भ : वाशीम येळबारा, बाभूळगाव ४५, पार्डी टाकमोर ७६, राजगाव ४७, नागठाणा ४८, कोंढाळा ७४, केनवड ४०, चांडस ४१, आसेगाव ५६, येवता, पुलगाव ३४, धानोरा, लोही, यवतमाळ, वेणी ३८, हिवरी, अर्जुना ६०, लोहारा ३९, कोठा ३६, मेटिखेडा ५७, चिखली ३८, मांगकिन्ही, देवळी, अर्णी, बोरगाव ३३, लोनबेहल ५१, विजय गोपाल ६०, भिडी ४२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : ‘कुरुक्षेत्रा’वरील महाभारत

fishery Industry : मत्स्यव्यवसायासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करू; केंद्रीय कृषिमंत्र्यासह दुग्धव्यवसाय मंत्र्यांची ग्वाही

Majalgaon Dam : माजलगाव धरणाची पातळी निम्म्यापुढे पोचली

Akola Crop Damage : पीक विमा कंपन्यांना नफा देण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत द्या, पालकमंत्र्यांना सत्ताधारी आमदारांनी सुनावलं

Kolhapur District Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेत २ कोटी ८६ लाखांचा कर्मचाऱ्यांनी केला गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT