Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

Weather Update Kolhapur : हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यांत दिवसभर कधी जोरदार, तर कधी हलक्या स्वरूपाच्या पावसाने दिलासा दिला.

sandeep Shirguppe

Panchaganga River Rain : कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रातील पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली. तर पंचगंगा, कुंभी, कासारी नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. राधानगरी धरणात २.५४ टीएमसी पाणीसाठा आहे.

आज (ता.०१) पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे ७ बंधारे पाण्याखाली आहेत.

धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी २.५४ , तुळशी १.३३, वारणा ११.८५, दूधगंगा ४.५३, कासारी ०.९२, कडवी १.२८, कुंभी ०.९२, पाटगाव १.६१, चिकोत्रा ०.५१, चित्री ०.५६, जंगमहट्टी ०.४९, घटप्रभा १.४३, जांबरे ०.५४, आंबेआहोळ ०.८९, सर्फनाला ०.०३ व कोदे लघु प्रकल्प ०.०८ इतका पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी फुटात

राजाराम १७.१०, सुर्वे १९.५, रुई ४५, इचलकरंजी ४३.२, तेरवाड ३९.९, शिरोळ ३१, नृसिंहवाडी २४, राजापूर १३.६ तर नजीकच्या सांगली ७.९ व अंकली ८.१ अशी आहे.

घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड या घाट माथ्यांवरील तालुक्यांत जोरदार पावसाने झोडपले, तर करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यांत दिवसभर कधी जोरदार, तर कधी हलक्या स्वरूपाच्या पावसाने दिलासा दिला. गेल्या आठवड्यापासून अधून-मधून होणाऱ्या पावसानेही पाठ फिरवली होती. यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने माळरानातील पिकांनी माना टाकल्या होत्या. पावसाने पिकांना उभारी मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT