Maharashtra Rain Alert : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

Monsoon Rain News : कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निवळले असले तरी महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. १) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणाच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सर्वाधिक ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातही हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान आहे.

Weather Update
Weather Update : विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.२ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

गुजरातच्या किनाऱ्यापासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या किनाऱ्यालगत पुन्हा ढग जमा होऊ लागले आहेत.

आज (ता. १) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update
Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

मॉन्सून लवकरच देश व्यापणार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. ३०) उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मूच्या उर्वरित भागासह राजस्थान, हरियाणा, आणि पंजाबच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. दोन दिवसांत राजस्थान, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या आणखी भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे. मोसमी वारे लवकरच देश व्यापणार असून, देशभरात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com