Sangli Rain agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात वरूणराजाची कृपादृष्टी, दुष्काळी भागात खरिपाच्या पेरण्यांना वेग

Farmers Kharip Crop : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. हा पाऊस खरीप हंगामाला वरदान देणारा ठरला आहे.

sandeep Shirguppe

Sangli Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सांगली जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने दुष्काळी भागासह अन्य परिसरातही खरिपाच्या पेरण्यांचा वेग आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावांसह तालुक्यात या वर्षी मॉन्सूनच्या सुरवातीलाच पावसाने धमाकेदार हजेरी लावली.

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. हा पाऊस खरीप हंगामाला वरदान देणारा ठरला आहे. घाटमाथ्यावर २३९५ हेक्टर खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे खरीप हंगामाच्या पेरण्या हळूहळू सुरू होणार आहेत.

मॉन्सूनने प्रारंभीच जोरदार हजेरी लावली. ओढे, बंधारे, विहिरी, तलाव जलमय झाले आहेत. पावसाने शेतात पाणी साचून राहिले आहे. उघडीप होण्यास वेळ लागणार आहे. खरीप पेरणी व हंगाम लांबण्याची शक्यता आहे.

कवठेमहांकाळ मंडल अंतर्गत कवठेमहांकाळ, कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, मळणगाव, शिरढोण, लांडगेवाडी, जायगव्हाण, मोरगाव, देशिंग, बोरगाव, खरशिंग, बनेवाडी, अलकुड (एम.), हरोली, झुरेवाडी, जाधववाडी या गावांचा समावेश आहे.

घाटमाथ्यावरील शेतकरी द्राक्षांसह खरीप ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेतात. प्रतिवर्षी खरिपाच्या पार्श्वभूमीवर मेअखेरीस शेतकरी हंगामाची पूर्वतयारी व शेतीची मशागत करतात.

त्यानंतर मृग नक्षत्रावर, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून खरीप पेरणीस सुरवात करतात. या वर्षी काही भागात अवकाळी, मॉन्सूनपूर्व आणि गेली चार-पाच दिवसांपासून तालुक्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. शेतात व चोहीकडे पाणी, अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांनी खरिपाच्या मशागतीची तयारी केली आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत मशागत केलेली नाही. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगाम पेरण्यांना वेग येणार आहे. घाटमाथा परिसरातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, जाखापूर, कुंडलापूर, कुचीमध्ये या वर्षी वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी उघडीप मिळाली आहे. लवकरच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.

घाटमाथ्यावरील खरीप क्षेत्र (हेक्टर)

खरीप ज्वारी (९७०), मका (९४६), बाजरी (१२), मूग (६८), उडीद (२७५), भुईमूग (१२४). एकूण सर्वसाधारण क्षेत्र (२३९५ हेक्टर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT