Banana Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत केळी विमाधारकांवर अन्याय

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ च्या हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत.
Banana crop insurance
Banana crop insuranceAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : सदोष हवामानमापक यंत्र व हवामानाच्या चुकीच्या माहितीमुळे थंडी व अधिक तापमान यासंबंधीच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना आहे.

फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ च्या हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. या योजनेची कार्यवाही हवामान म्हणजेच तापमान, वारा, गारपीट याबाबतच्या नोंदी, माहिती यानुसार विमा कंपनी करते. केळी पिकाला कमी व अधिक तापमान, वेगाचा वारा आणि गारपीट या समस्यांबाबत विमा संरक्षण आहे.

Banana crop insurance
Banana Crop Insurance : केळीच्या नुकसानीचे परतावे अनेक विमाधारकांना अप्राप्त

हवामानाची माहिती घेण्यासाठी हवामानमापक विविध महसूल मंडलांत कार्यरत आहेत. एका खासगी कंपनीकडून हवामानमापक केंद्रांचे संचलन केले जाते. याच कंपनीकडून हवामानाची माहिती (डाटा) विमा कंपनी, शासन घेते व त्यानुसार परतावे देणे, नुकसान भरपाई देणे याची कार्यवाही केली जाते. परंतु जिल्ह्यात बसविलेली हवामानमापक यंत्रे सदोष असल्याने अनेक मंडलांतील शेतकरी कमी तापमान (थंडी) व अधिक तापमानासंबंधीच्या परताव्यांपासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी यावल येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, विमा कंपनी ज्या हवामानमापक केंद्रांकडून माहिती घेऊन नुकसान भरपाई देते ते हवामानमापक यंत्र कुठे आहे, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. अनेक भागात हवामानमापक केंद्रांची दयनीय अवस्था झाली आहे.

Banana crop insurance
Banana Crop Insurance : केळी पीकविमाधारकांना मिळणार अधिकची भरपाई

त्याभोवती वृक्ष, काटेरी झुडपे, आडोसा आहे. यामुळे तापमान, थंडी, वारा याच्या नेमक्या, अचूक नोंदी होत नाहीत. यामुळे यावल तालुक्यातील केळीविमाधारकांना अधिक तापमानाच्या भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. निवेदन देताना मुकेश येवले, जगदीश कवडेवाले, अतुल पाटील, डी. पी. साळुंखे आदी उपस्थित होते.

पिंप्रळासह अन्य मंडलांवरही अन्याय

थंडी किंवा कमी तापमानाच्या नुकसान भरपाईसाठी जळगाव तालुक्यातील भोकर व म्हसावद ही मंडले पात्र ठरली आहेत. परंतु जळगाव तालुक्यातील पिंप्राळा, आसोदा, नसिराबाद ही मंडले पात्र ठरलेली नाहीत. दोन मंडलांतील हवाई अंतर फारसे नाही.

तरीदेखील पिंप्राळा व अन्य मंडलांतील हवामानमापक केंद्रांत थंडीच्या किंवा कमी तापमानाच्या वेगवेगळ्या नोंदी कशा झाल्या, असा प्रश्न जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द, फुपनगरी, कानळदा, नांद्रा बुद्रूक येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

थंडीच्या नुकसान भरपाईसंबंधी जिल्ह्यातील फक्त ३६ मंडलांतील केळीविमाधारक शेतकरी पात्र ठरले आहेत. यासंबंधी कृषी विभाग, विमा कंपनीने योग्य कार्यवाही करून पिंप्राळा, आसोदा, नसिराबाद ही मंडलेही थंडीच्या नुकसान भरपाईसाठी पात्र घोषित करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com