Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Rain: पूर्व विदर्भात पावसाची हजेरी

Heavy Rain Update: मेमध्ये बरसलेल्या पावसाने जूनमध्ये मात्र खंड दिला. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मंगळवारी (ता. १०) सायंकाळी यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: मेमध्ये बरसलेल्या पावसाने जूनमध्ये मात्र खंड दिला. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मंगळवारी (ता. १०) सायंकाळी यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या वेळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने यवतमाळ जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली. चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) आणि मंगळवारी (ता. १०) वादळी वाऱ्याने थैमान घातले. यात तब्बल ५०१ घरांची पडझड झाली. त्यातील ३९२ घरांचे अंशतः तर १०८ गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. कांदा, पालक, तीळ, केळी या पिकांनाही याचा फटका बसला.

आर्णी, केळापूर, झरी जामणी, वणी, मारेगाव, पुसद, दिग्रस उमरखेड, महागाव हे तालुके सर्वाधिक प्रभावित ठरले. घाटंजी तालुक्‍यातील जांब येथील रामकृष्ण कुडमते (वय ६०) हे शेतातून परतत असताना वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक झाड त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात झाडाखाली दबून कुडमते यांचा जागीर मृत्यू झाला.

साखरा (ता. घाटंजी) येथे उच्च दाब वीज वाहिनीचा मनोरा कोसळला. पुसद तालुक्‍यातील मोप येथील तानाजी पोले यांच्या घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले. गहुली गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. दिग्रस शहरातील देवनगर भागात लक्ष्मी कांबळे, गोपाळ दुधे, संध्या पटेल, बळीराम भुसारे, रवींद्र कवीश्‍वर तसेच इतर ३० जणांच्या घरांचे नुकसान झाले.

पावसामुळे पाच जनावरांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातही वादळीवारे व पावसाने जनजीवन विस्कळित झाले. येरवा (ता. पवनी) येथे स्मशानभूमीचे छत कोसळल्याने महानंदा वाकडीकर (वय ३७), सीमा अवसरे (वय ४८) या जखमी झाल्या. पवनी येथे चंद्रमणी बौद्ध विहार परिसरात असलेली ४५ फूट उंच मूर्ती वाऱ्यामुळे कोसळली.

चंद्रपुरात मुसळधार पाऊस

मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सहानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. ताडोबा मार्गावरील पदमापूर येथे पावसामुळे रस्त्यावर झाडे पडली. त्यामुळे ताडोबाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी दोन्ही बाजूने होती. पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज वितरण प्रणाली प्रभावीत झाल्याने अनेक भागातील वीजपुरवठा अनेक तास खंडित होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT