Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : पावसामुळे पाईट येथे घरे, पॉलिहाउसला फटका

Rain Update : पाईट परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने येथे मंगळवारी (ता. १४) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान वाड्या-वस्त्यांवरील आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडले आहेत.

Team Agrowon

Pait News : पाईट परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने येथे मंगळवारी (ता. १४) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान वाड्या-वस्त्यांवरील आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडले आहेत.

चिखलवाडी रस्त्यावरील चैतन्य व नंदू शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी मात्र टळली. तसेच इतरही अनेक ठिकाणी घरे, गोठे, पडवीवरील पत्रे उडून गेली आहेत.

कावडे वस्तीवरील नितीन कावडे यांच्या पॉलिहाउसचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून, एक पॉलिहाउस जमीनदोस्त झाले असून दुसऱ्याचे छप्पर उडाले आहे. पाईट परिसरात जोरदार वादळी वारे झाल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून पुरवठा पूर्ववत केला आहे. विजेचे खांब कोसळल्याने आंबोली फीडर बंद पडले. पावसामुळे परिसरातील वीटभट्टीतील तयार विटा मोठ्या प्रमाणावर भिजल्या आहेत. या सर्व नुकसानीचे शासनाने पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT