Weather Update : वादळी वारे अन् विजांसह पावसाचा हवामान विभागाचा इशारा

Rain Forecast : उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात वादळी पाऊस देखील दणका देत आहे. कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी ४२ अंशांच्या पार आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Pune News : उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात वादळी पाऊस देखील दणका देत आहे. कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी ४२ अंशांच्या पार आहे. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update
Weekly Weather : अति उष्ण हवामान; अल्प पावसाची शक्यता

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मालेगाव, अकोला, जळगाव, चंद्रपूर, धुळे येथे तापमान ४३ अंशाच्या वर आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पुन्हा ४२ अंशांपार पोचला आहे. आज (ता. ३०) राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

Weather Update
Weather Update : वादळी पावसाचा अंदाज

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४१.०, धुळे ४३.०, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३८.७, महाबळेश्वर ३३.२, मालेगाव ४३.४, नाशिक ४०.७, निफाड ४०.२, सांगली ३८.६, सातारा ३९.२, सोलापूर ४२.०, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३५.०, रत्नागिरी ३३.६,

छत्रपती संभाजीनगर ४२.२, धाराशिव ४१.२, परभणी ४२.५, अकोला ४३.३, अमरावती ४२.०, बुलडाणा ४१.२, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४३.२, गडचिरोली ४१.८, गोंदिया ४०.२, नागपूर ४०.६, वर्धा ४१.५, वाशीम ४१.४, यवतमाळ ४२.०.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४३.४, अकोला ४३.३, जळगाव ४३.२, चंद्रपूर ४३.२, धुळे ४३.०, छत्रपती परभणी ४२.५, संभाजीनगर ४२.२, ब्रह्मपुरी ४२.२, सोलापूर ४२, अमरावती ४२, यवतमाळ ४२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com