Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात पर्जन्यमान कमीच

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा कमी पर्जन्यमान कमीच राहिले आहे. मागील वर्षी धुळे, नंदुरबार जळगाव जिल्ह्यांत ऑक्टोबरच्या सुरवातीपर्यंत १०० टक्के पाऊस झाला होता.

यंदा जळगाव जिल्ह्यात ९२ टक्के, धुळ्यात ८१ टक्के आणि नंदुरबारात ८० टक्के एवढा पाऊस झाला आहे.

जळगावचे एकूण पाऊसमान ७७५ मिलिमीटर एवढा पाऊस जून ते सप्टेंबर यादरम्यान होतो. परंतु एवढा पाऊस यंदा झालेला नाही. धुळ्यात पावसाळ्यातील चार महिन्यात ५७५ मिलिमीटर पाऊस पडतो. पण तेथेही ४३३.४ मिलिमीटर एवढाच पाऊस सप्टेंबरअखेर झाला आहे. अर्थात तेथेही कमीच पाऊसमान आहे.

नंदुरबारात ८६० मिलिमीटर एकूण पाऊस पडतो. नंदुरबारात कमी पाऊस असून, तेथे सप्टेंबरअखेर ६८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यात कमी पाऊसमान राहीले आहे. या तालुक्यांत फक्त ७० टक्केच पाऊस झाला आहे. तळोदा व धडगाव तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेर, पारोळा आदी पाच तालुक्यांत १०० टक्के पाऊस झाला आहे. धुळ्यात फक्त शिरपुरात पाऊसमान बरे होते. इतरत्र पाऊसमान कमीच राहीले आहे. कमी पावसामुळे धुळ्यात फक्त दोनच सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात पांझरा व अनेरचा समावेश आहे. नंदुरबारात मात्र दरा व देहली हे प्रकल्प ऑगस्टमध्येच १०० टक्के भरले होते.

जळगाव जिल्ह्यात रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील गारबर्डी, मोर, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर, वाघूर हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. गिरणा, अग्नावती, बहुळा, मन्याड, भोकरबारी हे प्रकल्प भरले नाहीत . जळगावसह धुळे व नंदुरबारात मागील चार वर्षे १०० टक्के पाऊस झाला आहे.

परंतु यंदा पावसात तूट आल्याने पुढे टंचाई राहू शकते. तसेच रब्बीबाबत फारसे आशादायी चित्र राहणार नाही, असेही दिसत आहे. या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील पावसासंबंधीची तूट आठ टक्के, धुळ्यात १९ टक्के आणि नंदुरबारात २० टक्के एवढी दिसत आहे.

रब्बीबाबत निराशा

खानदेशात मागील चार वर्षे रब्बी पिकांची पेरणी १०० टक्क्यांवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बीची पेरणी १२४ ते १५० टक्केही झाली आहे. परंतु यंदा मात्र एवढी पेरणी होणार नाही, असे दिसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पांतील जलसाठा अधिक वापरात येईल.

जून व ऑगस्टमध्ये मोठा खंड

खानदेशात जून व ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड होता. जूनमध्ये २५ दिवस आणि ऑगस्टमध्ये काही भागात २३ दिवस, काही गावांत २५ दिवस तर काही क्षेत्रात २७ दिवस एवढा मोठा पावसाचा खंड होता.

यामुळे मुरमाड, हलक्या जमिनीतील सोयाबीन, कापूस, कडधान्य व तृणधान्य पिकांची हानी झाली. ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र त्यानंतर काही दिवस पावसाची उघडीप होती. पुन्हा अधूनमधून खानदेशात कमी व अधिक पाऊस झाला. खानदेशात जुलै व सप्टेंबरमध्येच पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT