Kolhapur News: दिवाळीनंतर साखर बाजारात सावध वातावरण असून, सध्या साखरेची मागणी थंडावली आहे. येत्या हंगामात नवी साखर येण्याची शक्यता असल्याने व्यापारी सध्या खरेदीसाठी फारसा उत्साह दाखवत नसल्याचे चित्र आहे. केंद्राने नोव्हेंबरसाठी २० लाख टनांचा कोटा दिला आहे. कोटा कमी असला तरी खरेदीही फारशी नसल्याने याचा विशेष फायदा कारखान्यांना होणार नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून दर कमी होत आहेत. सणासुदीच्या काळातही मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने बाजारात फारशी तेजी दिसत नाही..देशात एक ऑक्टोबरपासून गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. पहिल्या महिन्यात ऊस उत्पादनात राज्यातील अग्रगण्य कारखाने आता हळूहळू सुरू होत आहेत. उत्तर प्रदेशात केवळ पंधरा ते वीस कारखाने सुरू आहेत. महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून ऊस हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस व शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे अजूनही हंगामाने गती पकडलेली नाही. कर्नाटकातही १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू झाला पण शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे उत्तर कर्नाटकातील कारखाने अजून सुरू झाले नाहीत..Sugar Export: साखर निर्यातीबाबत केंद्र सरकार सकारात्मक.आघाडीच्या तीन राज्यांतील परिस्थितीचा विचार करता यंदा उत्पादित झालेली साखर बाजारात यायला नोव्हेंबरचा उत्तरार्ध होईल अशी शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये जुन्या साखरेचीच विक्री बहुतांशी प्रमाणात होणे अपेक्षित आहे. यंदा सलग सुरू असणारा पाऊस कारखानदारांची डोकेदुखी वाढवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा देशांतर्गत बाजारात उशिरा साखर येईल, असा अंदाज आहे. केंद्राने अजून इथेनॅाल व निर्यातीबाबत कोणतेही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे इथेनॉलसाठी किती साखर वळवायची याबाबत संभ्रमावस्था आहे. दिवाळीनंतर साखरेचे दर ३८०० रुपये क्विंटलच्या आसपास स्थिर झाले आहेत. सध्या फारसे सण नसल्याने व्यापाऱ्यांनी शक्य तितक्याच साखर खरेदीला प्राधान्य दिले आहे. यामुळे नजीकच्या काळात साखरेचे दर वाढतील याबाबत नेमके सांगता येत नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले..Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी.चढ-उतार वगळता दर कायम राहणारनोव्हेंबरच्या सुरुवातीस उत्तर प्रदेशात एम साखरेचा दर ३९०० ते ४००० रुपये इतका आहे. महाराष्ट्रात हा दर ३८३० पर्यंत आहे. तर गुजरातमध्ये ३८०० ते ३९०० पर्यंत साखरेचे दर आहेत. येत्या काही दिवसांत दराची सरासरी किरकोळ चढ-उतार वगळता कायम राहील असा अंदाज आहे..राज्याच्या कोट्यात १९ टक्क्यांची घटकेंद्र सरकारने नोव्हेंबर २०२५ साठी देशातील साखर कारखान्यांसाठी मासिक कोटा २० लाख टन जाहीर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा कोटा २४ लाख टन होता. नोव्हेंबरसाठी एकूण कोट्यात ४ लाख टनांची घट करण्यात आली आहे. या महिन्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि हरियाना या प्रमुख साखर उत्पादक राज्यांच्या कोट्यात घट झाली आहे. तर मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब आणि तमिळनाडू यांच्या कोट्यात वाढ झाली आहे. महाराष्ट्राचा कोटा ऑक्टोबरच्या तुलनेत १४.०८ लाख टनांवरून ५.८५ लाख टनांवर आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत १९.३८ टक्क्यांची घट झाली आहे. उत्तर प्रदेशचा २२.४३ टक्के तर कर्नाटकचा कोटा ७.८३ टक्क्यांनी घटवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.