Nagpur News: २५ लाख हेक्टरपेक्षा अधिक कापूस लागवड क्षेत्र, लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन आणि त्यातूनच मोठ्या संख्येने उभे झालेले वस्त्रोद्योग यामुळे तमिळनाडू हे कधीकाळी कापूस मूल्यवर्धनातील आघाडीचे राज्य होते. मात्र मजुरांच्या समस्येमुळे तमिळनाडू आता कापूस उत्पादनात पिछाडल्याने १९६ वस्त्रोद्योगांना टाळे लागले आहे. परिणामी तेथील सरकारची चिंता वाढली आहे. .केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ पूर्वी महाराष्ट्राच्या तुलनेत तमिळनाडू राज्यात कापसाखालील सर्वाधीक २५ लाख हेक्टर क्षेत्र होते. कावेरी नदीच्या खोऱ्यात काळी कसदार जमीन असून याच परिसरात कापसाची शेती केली जाते. एक्स्ट्रा लॉग स्टेपल (फायबर लेंथ ३२ एमएम) धागा असलेल्या वाणांची लागवड हे शेतकरी करीत करतात. १५ ऑगस्टनंतर पेरणी होत मार्चअखेर या भागातील हंगाम संपतो..Cotton Market : कपास किसान अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी ठप्प.दर्जेदार कापसाचे उत्पादन होत असल्याने या भागात वस्त्रोद्योगाची उभारणी मोठ्या संख्येने झाली. त्यानंतरच्या काळात कोईम्बतूरला वस्त्रोद्योगाचे हब म्हणून मान्यता मिळाली. तब्बल २०० उद्योग या भागात उभारले गेले. त्यानंतर मात्र कापूस उत्पादकपट्ट्यात लागवड ते वेचणी अशा विविध टप्प्यांवर मजुरांची समस्या निर्माण झाली. कापूस एकाचवेळी वेचणीस येत असल्याने त्याकामी मजुरांची उपलब्धता करणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत गेले. मजुरांनी देखील वेचणी दर वाढविल्याने उत्पादकता खर्च भरमसाठ वाढला..अशातच कापूस शेतीच्या यांत्रीकीकरणाची या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु ती पूर्णत्वास गेली नाही. अशा अनेक कारणांमुळे तमिळनाडूतील २५ लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र टप्याटप्याने कमी होत पाच लाख हेक्टरवर आले. त्यानंतर गेल्या सात वर्षाच्या कालावधीत त्यात पुन्हा घट होत हे क्षेत्र एक लाख हेक्टरवर आले आहे. येत्या काळात या क्षेत्रात आणखी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. कापूस लागवड कमी करीत शेतकरी मका पिकाकडे वळल्याचे सांगितले जाते. त्यासोबतच काही शेतकरी धान (भात) उत्पादन करतात त्यानंतरच्या काळात मूग, उडीद याची लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे..Cotton Crop Loss: वेचणीला आलेला कापूस भिजला.कोईम्बतूरचा वस्त्रोद्योग लयासकोईम्बतूर पासून काही अंतरावर असलेल्या त्रिपूर जिल्ह्यात कापसाचे मूल्यवर्धन करणारे २०० उद्योग होते. मात्र कापसाची उपलब्धता होत नसल्याने ते कमी होत एलजी, केएलजी अशा मोठ्या चार ते पाच उद्योगच शिल्लक राहिले आहेत. उर्वरित कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. तब्बल १९६ कापूस प्रक्रिया उद्योगांना कुलूप लागले असून सुरू असलेल्या उद्योगांची गरज भागविण्याकरीता गुजरात राज्यातून कापसाची खरेदी केली जात आहे..संशोधन संस्थांचा प्रभाव नाहीकेंद्रीय कापूस संशोधन संस्थेअंतर्गत तमिळनाडूतील कोईम्बतूर, पेरुम्बलुर, श्रीविल्लीपूतुर या ठिकाणी कापूस संशोधनात्मक कार्यासाठी केंद्र आहेत. परंतु लागवड क्षेत्र २५ लाख हेक्टरवरुन एक लाख हेक्टरपेक्षा कमी झाले असताना त्यांच्याकडून उपायांवर भर दिला गेला नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.