Ground Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Survey : पर्जन्यमान वाढले, पण भूजल घटले

Decrease in Ground Water Level : चंद्रपुर जिल्ह्याचे पर्जन्यमान वाढले असले तरी नऊ तालुक्यांतील भूजल पातळीत थोडीफार घट झाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे.

Team Agrowon

Chandrapur News : चंद्रपुर जिल्ह्याचे पर्जन्यमान वाढले असले तरी नऊ तालुक्यांतील भूजल पातळीत थोडीफार घट झाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. पाण्याच्या पातळीतील या घटीमुळे सात तालुक्यांत टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याच्या पातळीची नोंद घेतली जाते. जिल्ह्यात १३४ निरीक्षण विहिरी आहेत. जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर या महिन्यांत या निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली जाते. यात सप्टेंबरमधील पाण्याच्या पातळीची नोंद महत्त्वाची असते.

या महिन्याच्या नोंदीनुसार जिल्हा प्रशासन टंचाईचे आराखडे तयार करण्याचे काम करते. सप्टेंबरमध्ये १३४ निरीक्षण विहिरींतून पाण्याची पातळी तपासण्यात आली. त्यात सात तालुक्यांत पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. त्यात बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि जिवती तालुक्यांचा समावेश आहे.

त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार ४०.१७ मिमी आहे. चार महिन्यांत जिल्ह्यात ११२० मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मात्र, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि जिवती तालुक्यांत पावसाची टक्केवारी कमी आहे. त्याचा परिणाम या तालुक्यांच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने स्पष्ट केले आहे. पाणी पातळीत घट झाली असली तरी टंचाई स्थिती निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

०.१३ मीटरने पातळी वाढली

जिल्ह्यात मागीलवर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. सरासरी पर्जन्यमान एक हजार ४० मिमी आहे. मागीलवर्षी जिल्ह्यात ११२० मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाची टक्केवारी १०८.४५ इतकी आहे. या पावसाने टक्केवारी वाढली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीत ०.१३ मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात १३४ निरीक्षण विहिरी आहेत. या विहिरींतील पाण्याच्या पातळीवरून ०.१३ मीटरने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT