Monsoon  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाज; राज्यभरात पुढील ४ दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update : हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पुढील ४ दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज दिला. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Pune News : माॅन्सूनचा प्रवास आज थबकला होता. तर राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाही. हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पुढील ४ दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज दिला. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. 

हवामान विभागाने काल अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात प्रगती केली पण आज माॅन्सूनची प्रगती झाली नाही. त्यामुळे माॅन्सूनची सिमा आज मुंद्रा, उदयपूर, शिवपुरी, सिध्दी, चैबसा, हल्दीया, पाकूर, साहीबगंज आणि रक्सौल भागात कायम होती. 

माॅन्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पोषक आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्र, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाच्या काही भागात दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवसांमध्ये पावसाचा अंदाज दिला. आज आणि उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील. विदर्भातही ठिकठिकाणी पावसाचा अंदाज असून पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT