Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : पश्‍चिम विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी

Rain Update : मागील २४ तासांत या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

Team Agrowon

Akola News : मागील २४ तासांत या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्या झालेल्या भागाला दिलासासुद्धा मिळाला तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हातात घेतले आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात पणज व मुंडगाव मंडलांमध्ये जोरदार पावसाने हजेरी दिली. या मंडलांमध्ये अनुक्रमे ४६.३ व २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे त्याठिकाणी नदी-नाले वाहते झाले. मूर्तीजापूर व इतर तालुक्यांमध्येही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात अमडापूर मंडलात ५१.३, मेरा खुर्द २०.५, हातणी ७०.३, पेठ १७, चांदई १५, लोणार तालुक्यात हिरडव मंडलात ६१.८, वाशीम जिल्हयात चांगला पाऊस झाला. प्रामुख्याने वाशीम १०.३, पार्डी टकमोर २८.५, अनसिंग ३९.८, वारला ३९.८, कोंढाळा झामरे २३.८, पार्डी आसारे ३९.८, रिसोड तालुक्यात भर जहाँगीर ६०.५, वाकद ४०.५, केनवड २५.५ पाऊस झाला.

कारंजा तालुक्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रामुख्याने कारंजा मंडलात ३२.८, धनज बुद्रूक २५.८, हिरडव लाहे १८.८, उंबरडा बाजार २८.५, कामरगाव ४८.५, खेर्डा बुद्रूक ५०.५, येवता २४. ५ मिलिमीटर पाऊस झाला.

जोरदार पावसाची प्रतीक्षाच

पश्‍चिम विदर्भात मागील २४ तासांत बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. सर्वदूर जोरदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी या पावसाने पेरण्यांना दिलासा मात्र निश्‍चितच मिळाला. प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात पेरण्यांना आधीच सुरुवात झालेली आहे. रिसोड, मालेगाव, कारंजा तालुके आघाडीवर निघालेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT