Heavy Rain : मुसळधारेत जमीन खरडली

Agriculture Damage : पहिल्याच मोठ्या पावसाने राळेगाव तालुक्यातील ३२० हेक्टरवरील बियाणे खरडून गेले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Heavy Rain
Heavy Rain Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. २० जूनला पाच मंडलांत अतिवृष्टी झाली. शुक्रवारी (ता. २१) राळेगाव तालुक्यातील अकरा गावांत अति मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच मोठ्या पावसाने राळेगाव तालुक्यातील ३२० हेक्टरवरील बियाणे खरडून गेले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पावसाचा लहरीपणा दिसून येत आहे. काही भागात अति मुसळधार, मुसळधार पाऊस होत असून काही भाग कोरडाच राहत आहे. दोन दिवसांपूर्वी दारव्हा तालुक्यातील लाडखेड, महागाव, नेर तालुक्यातील मालखेड, वटफळी, माणिकवाडा व बाभूळगाव तालुक्यातील सावर मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारी राळेगाव तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे रौद्र रूप पाहावयास मिळाले.

Heavy Rain
Rain Update : कोकणात जोर ओसरला

काही तासांत शंभर मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद या परिसरात झाली. अतिमुसळधार पावसाने जवळपास अकरा शेतशिवारातील जमीन खरडून गेली. शेतातून पाण्याचे पाट वाहत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पेरणीनंतर झालेल्या पावसाने शेतकरी समाधानी होता. मात्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. जिल्ह्यातील काही भागांत पावसाची प्रतीक्षा आहे. तर काही भागात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस होत आहे.

Heavy Rain
Monsoon Rain : पुढील आठवडाभर पाऊस कसा राहणार ? मराठवाडा, विदर्भात पावसाचे प्रमाण कसे राहू शकते?

निसर्गाच्या या लहरीपणाचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यंदा बियाणे खरेदीपासून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांवर जादा दराने बियाणे घेण्याची वेळ आली आहे. त्यात पेरणीनंतर काही दिवसांत पावसाने झटका दिल्याने शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणून ठेवले आहे.

आठ मंडलांत अतिवृष्टी

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (ता. २२) आठ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. यात बाभूळगाव तालुक्यातील सावर मंडलात ७७.२५, दारव्हा तालुक्यातील लाडखेड तसेच महागाव दोन्ही मंडलांत ७८.२५, आर्णी सावळी सदोबा ८९.२५, नेर माणिकवाडा ९१.५०, वटफळी ६८.२५, मालखेड९३ तर पुसद तालुक्यातील बेलोरा मंडलात ७४.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीचा या गावांना फटका

राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील ७५ हेक्टर, वाठोडा ९०, रानवड ५५, परसोडा २०, करंजी १७, सावनेर २०, चिंचोली १०, भुलगड १२, टाकळी १०, पिंपळसेंडा १० हेक्टर, तसेच धानोरा येथील एक हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com