Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात ९३ टक्क्यांवर पाऊस

Rain Update : खानदेशात सुरुवातीपासून चांगला पाऊस येत आहे. तिन्ही जिल्ह्यांत एकूण सरासरीच्या ९३ टक्के पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Jalgoan News : खानदेशात सुरुवातीपासून चांगला पाऊस येत आहे. तिन्ही जिल्ह्यांत एकूण सरासरीच्या ९३ टक्के पाऊस झाला आहे. जून, जुलै व ऑगस्टमध्येही सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसाचे अनेक दिवस अद्याप अधिकृतपणे राहिलेले आहेत. यामुळे सर्वत्र १०० टक्क्यांवर पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.

जून व जुलैत चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये फक्त १० दिवस पावसाचा खंड होता. पुन्हा पाऊस मागील सहा ते सात दिवसांपासून सुरू आहे. काही भागांत हलका ते मध्यम व काही भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांत अनेक महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. जळगाव जिल्ह्यात १२ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. तर धुळ्यातही शिंदखेडा, धुळे, साक्री तालुक्यांतील अनेक भागांत अतिवृष्टी झाली.

जळगाव जिल्ह्यात एकूण ६३२ मिलिमीटर पाऊस पडतो. धुळ्यात ५६५ आणि नंदुरबारात ८५२ मिलिमीटर पाऊसमान आहे. यातील ९३ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबारमध्ये सातपुडा पर्वतासह अन्य भागांतही जोरदार ते मध्यम पाऊस झाला. यामुळे अनेक नदी-नाले खळालू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात मागील वेळेस आठ टक्के व धुळे आणि नंदुरबारात २० टक्के प्रत्येकी पावसाची तूट होती. यंदा मात्र पावसाचा पूर्ण एक महिना अधिकृतपणे आहे. तसेच या महिन्यातील काही दिवसही राहिले आहेत. यामुळे यंदा पावसाची तूट कुठेही नसणार आहे. सर्वत्र १०० टक्के किंवा शंभरीपार पाऊस पडेल, असे संकेत दिसत आहेत.

जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी एकूण ५८० मिलिमीटर पाऊस चार महिन्यांत पडला होता. यंदा तीन महिन्यंपेक्षा कमी कालावधीत ५८० मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाला आहे. धुळ्यातही एकूण पाऊसमान ९० टक्क्यांवर आहे. तर नंदुरबारमध्येही एकूण पाऊस ९४ टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती मिळाली.

जळगाव जिल्ह्यात मागील ४८ तासांत म्हसावद, चोपड्यातील हातेड व लासूर, एरंडोलातील रिंगणगाव, पारोळा, बहादरपूर, चाळीसगावातील चाळीसगाव, बहाळ, पाचोऱ्यातील नगरदेवळा, जामनेरातील नेरी, धरणगावातील पाळधी व सोनवद बुद्रुक या मंडलांत अतिवृष्टी झाली. खानदेशात रविवारी (ता. २५) दिवसभर काही भागांत जोरदार तर काही भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. सोमवारीही (ता. २६) सकाळपासून तुरळक, मध्यम पाऊस सुरू होता. काही भागांत अधूनमधून पाऊस सुरू होता.

पिके संकटात

खानदेशात मूग, उडीद, कापूस, ज्वारी, कांदा, कलिंगड, पपई ही पिके अतिपावसाने संकटात आली आहेत. तर केळी पिकातही सततच्या पावसाने करपा रोग दिसत आहे. लहान व मोठ्या केळी बागांत करपा रोग आहे. काळ्या कसदार जमिनीत सखल भागात पाणी साचून नुकसान होत आहे. सतत पाणी येत असल्याने पाणी जिरत नाही. पाणी वाहून नेणारे मार्गही मोकळे नसल्याने अडचणी येत आहेत. कापूस पीक पिवळे, लाल पडत आहे. त्यास हवी तशी पाते-फुले, कैऱ्या लगडलेल्या नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM-KUSUM Scheme : पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतजमिनीवर सौर प्रकल्पात महाराष्ट्राची पिछाडी; तर सौर कृषीपंप, ग्रीड जोडणीत आघाडी

Sharad Pawar: 'फडणवीसांना काय अधिकार आहे?' राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवार यांचा संतप्त सवाल

India US Trade Deal: भारत–अमेरिका व्यापार करार शेतकऱ्यांसाठी धोकादायक; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Purushottam Unhale Retirement: आत्मा प्रकल्प संचालक उन्हाळे झाले निवृत्त

Entrepreneurship Workshop: महानिर्यात कार्यशाळेद्वारे सूक्ष्म व लघू उद्योजकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT