Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

Rain Forecast : उर्वरित तुरळक ठिकाणी ऊन, सावल्यांच्या खेळात श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Rain Alert
Rain Alert Agrowon
Published on
Updated on

Pune News : कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात दमदार पावसाने धुमशान घातले आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित तुरळक ठिकाणी ऊन, सावल्यांच्या खेळात श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात एकामागून एक तयार होत असलेल्या कमी दाबांच्या क्षेत्रांमुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेर पासून, राजस्थानातील वादळी प्रणालीच्या केंद्रापासून, गुणा, सिधी, दाल्तोंगंज, ठळक कमी क्षेत्राचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

Rain Alert
Nanded Rain : नांदेडला आठ मंडलांत अतिवृष्टी

सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३०.८ अंश तापमानाची नोंद झाली. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानाचा घट झाली आहे, तसेच वाऱ्याचा वेग वाढल्याने हवेत गारठा वाढला आहे. कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सोमवारी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.

आज (ता. २७) कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. रायगड, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Rain Alert
Monsoon Rain : खानदेशात आठवडाभरानंतर पाऊस

पूर्व राजस्थानात वादळी प्रणाली

कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढल्याने पूर्व राजस्थानात वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. राजस्थानच्या उदयपूरपासून ६० किलोमीटर आग्नेयेकडे, गुजरातच्या अहमदाबादपासून १८० किलोमीटर इशान्येकडे असलेली ही प्रणाली गुजरात, अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल आणि परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय असून ते झारखंड आणि उत्तर ओडिशाकडे सरकण्याची शक्यता आहे. गुरूवारपर्यंत (ता. २९) पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com