Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या लखलखाटांसह पाऊस

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात रविवारी (ता.१२) विजांच्या लखलखाटांसह जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात रविवारी (ता.१२) विजांच्या लखलखाटांसह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, सोमवारी (ता.१३) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे आंबा, कजू बागायतदारांचे नुकसान अटळ आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सदृश्य वातावरण आहे. वाढलेल्या तापमानवाढीने नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी (ता.१३) बांदा, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, कुडाळ तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.

सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायकांळी उशिरा सावंतवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. विजांचा लखलखाट आणि जोरदार वारा यामुळे सावंतवाडी परिसरात काही काळ वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

दरम्यान सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सध्या आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय अतिंम टप्प्यातील काजू बी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

या पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा पीक वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने १५ मे पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pragati Award: देवगिरकरांना ‘प्रगती’ पुरस्कार जाहीर; आज वितरण

Fertilizer Management: माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन गरजेचे : डॉ. सुरवसे

Farm Road: पूर्वीचा शेतरस्ता असेल तर नवीन रस्त्याला मंजुरी मिळणार नाही, राज्य सरकारचा निर्णय

Wheat Export India : २५ लाख टन गहू निर्यातीला मंजुरी; शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय, केंद्र सरकारचा दावा

Mulberry Cultivation Registration: मराठवाड्यात ३५४७ एकरांवर तुती नोंदणी

SCROLL FOR NEXT