Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कुठे अडलास रे पावसा? सांग ना...

Monsoon Update : जून महिना सुरु झाला की वेध लागतो तो पहिल्या पावसाचा... वसंत ऋतूच्या आगमनाचा... पहिला पाऊस... हवाहवासा... आठवणींचा

Team Agrowon

प्रणिता भावसार

Monsoon In Maharashtra : जून महिना सुरु झाला की वेध लागतो तो पहिल्या पावसाचा... वसंत ऋतूच्या आगमनाचा... पहिला पाऊस... हवाहवासा... आठवणींचा... अगदी शहारून टाकणारा... उन्हाची लाही लाही संपवून अंगावर येणारा थंडगार वारा... पानांना, फुलांना आणि मातीला हलकंस ओल करून मातीचा सुगंध आसमंतात दरवळणारा... पहिला पाऊस... हा पहिला पाऊस खरंच खूप आठवणींनी भरलेला असतो ना...

अगदी लहानपणापासूनच... जुन्या रद्दी कागदांची केलेली नाव... ती नाव सोडण्यासाठी पावसात झालेलो मनसोक्त ओलेचिंब. शाळेत छत्री नेलेली असतानासुद्धा भिजत भिजत चिखलातून उड्या मारत घरी येणारे आपण... घरात आल्या आल्या आई ने केलेली गरमागरम भजी... आणि गरमागरम भुईमूगाच्या शेंगा....वा! आजसुद्धा तो दरवळणारा सुगंध आठवतोय...

पावसाच्या उंच धारा शोधत टेपरेकॉर्डरवर लावलेलं संथ गाणे आणि हातात वाफाळलेला चहा... नकळत हा पाऊस आपला मित्र कधी बनतो कळतच नाही... वाढत्या वयासोबत आणि वेळेसोबत सगळं काही बदलून जातं पण पावसाच्या आठवणी मात्र अगदी तशाच आठवतात. जबाबदारीचं ओझं असताना सुद्धा या पावसाने मनामध्ये कुठेतरी बालपण जिवंत ठेवलंय.

कळत नकळत हा पाऊस आपल्यासाठी आठवणींची गाठोडी देऊन जातो ना... दरवेळी नव्याने प्रेमात पाडतो.. पण या वेळी कुठे अडलास रे पावसा..? सांग ना.... खूप दिवस झाले रे... पण तू अजून का नाही पडलास...? प्रत्येक जण चातकासारखी तुझी वाट पाहतोय...

तू पुन्हा बरसशील आठवणीनीची गाठोडी भरवायला... उन्हाची लाही लाही मिटवायला... छोट्या छोट्या जीवांची तहान मिटवायला... आता असं वाटतंय युगे युगे तुझी वाट पाहतोय पण तू काही येत नाहीस. अन् आमचा दिवस असाच कोरडा जातोय... तुझी वाट बघण्यात!

शेतकरी राजाचं सगळं मन त्याच्या मातीत गुंतलेलं असतं रे... अन् त्याच्या शेतातील माती कितीतरी नाती जपतं, त्या पावसाची आतुरतेनं वाट बघत असतं.. तेच मन पावसामध्ये गुंतलेलं असतं... कधी एकदा पाऊस येईल अन् ती बहरून निघेल, तिला मोकळा श्वास घेता येईल...

तिच्या मातीचा सुगंध सर्वत्र पसरेल आणि तिला बहरलेलं पाहून ह्या शेतकरी राजाचा आनंद गगनात सुद्धा मावत नाही. तो सुद्धा तिच्या सोबत ओला चिंब होऊन आनंदात सहभागी होतो.

ज्या मातीसाठी त्याने आयुष्य पणाला लावलं... काबाडकष्ट केले... घाम गाळळेला असतो... तिला बहरलेलं पाहून त्याचं आयुष्य सार्थकी लागतं...

पावसा... निदान त्याच्या प्रामाणिक कष्टाकडे पाहून तरी ये... आतुर झालेल्या कोरड्या डोळ्याकडे पाहून तरी ये... अवकाळी पडण्यापेक्षा वेळेवर येत जात जा... तुझ्यामुळे बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी येत जा... खूप काही मागणी नाही रे... पण केलेल्या प्रामाणिक कष्टाचं योग्य फळ निसर्गाकडून मिळायलाच हवं...

तू आलास तर प्राणी पक्षी आनंदतील... शेतकरी सुखावेल... अन् आम्हाला आठवणींची नव्याने गाठोडी भरता येईल... तुला मनापासून प्रार्थना करते रे... पावसा...! आत लवकर ये... नाहीतर पाऊस ढगांमधून बरसण्याऐवजी... शेतकरी राजाच्या डोळ्यातून बरसेल...

लेखक - प्रणिता भावसार, ८६२६०२९८०१, पाथर्डी जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT