Shirol Flood agrowon
ॲग्रो विशेष

Shirol Flood : पावसाची उघडीप परंतु शिरोळ तालुका अद्यापही महापुराच्या विळख्यात

Panchaganga River : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इंचाने वाढ झाली असून, पाणीपातळी स्थिरावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Flood Affect : धरणातील विसर्ग व पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही शिरोळ तालुक्यातील अनेक गावात पूरपरिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र असून, पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कुरुंदवाड, नृसिंहवाडीसह अनेक प्रमुख मार्ग अद्यापही पाण्याखालीच आहेत. त्यामुळे दळणवळण यंत्रणा ठप्प असून, रस्ते कधी मोकळे होतील, याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इंचाने वाढ झाली असून, पाणीपातळी स्थिरावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पूरस्थिती कायमच आहे. दुपारपासून दिनकरराव यादव पुलावरून पाणी वाहत आहे. बस्तवाड रस्ता पूर्ण बंद झाला आहे. तर हेरवाड-तेरवाड रस्त्यावर ही पाणी आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल(ता.२९) कुरुंदवाड येथील पूरग्रस्तांना स्थलांतरित केलेल्या निवारा केंद्राला भेट दिली.

जिल्हाधिकारी येडगे यांनी गोठणपूर परिसर, शिवतीर्थ परिसर, शिकलगार वसाहत परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी करून पाणीपातळी वाढू लागल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी वेळेत स्थलांतर करण्याच्या सूचनाही पालिका प्रशासनाला दिल्या. महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही, असेही सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, गट विकास अधिकारी नारायण घोलप, सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार, वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, प्रकाश आलासे, नीलेश तवंदकर, कृष्णात भेंडे, आदी उपस्थित होते.

इचलकरंजीत पूर ओसरण्यास सुरुवात

इचलकरंजीत पंचगंगा नदीला आलेला पूर आजपासून ओसरण्यास सुरुवात झाली. आज सांयकाळपर्यंत एक इंच पातळी घटली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील एक-दोन दिवसांत पूर पूर्णतः ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूरबाधित क्षेत्रातील स्वच्छतेचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT