Solapur News : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी सुरू असलेल्या निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उच्च शैक्षणिक आणि संशोधन पात्रता असूनही काही नामवंत शास्त्रज्ञांना मुलाखतीसाठी न बोलावल्याने प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप होत आहे. अनेक उमेदवार आता न्यायालयीन मार्ग अवलंबण्याच्या तयारीत आहेत..महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी त्रिसदस्यीय कुलगुरू शोध समिती नेमली आहे. या समितीकडे १८ ते २० जणांनी अर्ज केले आहेत. येत्या ७ आणि ८ नोव्हेंबरला संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. परंतु पात्र उमेदवारांना डावलून अन्य १२ जणांना या मुलाखतीसाठी पत्रे पाठविण्यात आली आहेत..त्यातही यापैकी काही जणांवर त्यांच्या सेवाकाळात चौकशा सुरू आहेत, काहींच्या नावात आणि काहींच्या वयात बदल असल्याच्या तक्रारी आहेत. तर काहींनी प्राध्यापकपदाची केवळ ७ वर्षे पूर्ण केली आहेत, नियमात नसूनही अशा उमेदवारांना ही पत्रे पाठवली आहेत. वास्तविक, कुलगुरू पदाकरिता उमेदवाराकडे कृषी विषयातील पीएचडी पदवी, किमान २० वर्षांचा अनुभव आणि ८ वर्षे प्राध्यापक किंवा समकक्ष पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. .तसेच संशोधन लेख, प्रकल्प नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय समित्यांवरील सहभाग यासारख्या अटी अनिवार्य आहेत. अर्हतेच्या निकषांनुसार पात्र असलेले अनेक प्राध्यापक तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर, नवी दिल्ली) संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ यांनी या पदाकरता अर्ज केले, पण पात्रता पूर्ण असूनही या उमेदवारांना मुलाखतीसाठी डावलण्यात आले आहे. .MPKV Rahuri: महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाच महिन्यांपासून मिळेना कुलगुरू.काही उमेदवारांचे ‘प्रमुख शास्त्रज्ञ’ किंवा ‘संचालक’ म्हणून असलेले अनुभव प्राध्यापक समकक्ष धरले गेले नसल्याचा आरोप आहे. तसंच राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य सिद्ध केलेले आणि आयसीएआर व राज्य कृषी विद्यापीठे यांच्या संशोधन व्यवस्थेत कार्यरत असलेले प्रख्यात शास्त्रज्ञ यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याचा प्रकार घडला आहे..शास्त्रज्ञांकडून न्यायालयीन लढ्याची तयारीया अन्यायकारक वर्तणुकीमुळे अनेक पात्र शास्त्रज्ञांनी ज्यांना शोध समितीच्या मुलाखतीसाठी डावलण्यात आले, त्यात आयसीएआरमधून आलेल्या सर्वच्या सर्व ६ संचालक, प्रमुख शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यापूर्वी परभणीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि नागपूरच्या माफसुचे कुलगुरू यांची निवडही प्रमुख शास्त्रज्ञ या पदावरूनच झाली आहे. .MPKV Rahuri : प्रकल्पग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे.मग आताच हे नियम कसे काय बदलले, आम्हाला मुलाखतीसाठी बोलवायला हवे, निवड होणे न होणे, हा नंतरचा भाग आहे, पण त्या आधीच अपात्र कसे ठरवता, मग हा अन्याय का, हा या उमेदवारांचा आक्षेप आहे. आता या उमेदवारांनी थेट न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे..प्रत्येक शोध समितीचा दृष्टीकोन वेगळा राहतो आणि मतमतांतरे होतात, त्यामुळे अतिशय अनुभवी आणि मराठी भाषिक उच्चपदस्थ शास्त्रज्ञांना यामध्ये संधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे, यामुळे संस्थेचे नुकसान होऊ शकते. या उलट ज्यांची संभाव्य नावे यादीत आली आहेत. त्यात काही सन्माननीय अपवाद वगळता, बाकीचे उमेदवार हे अत्यंत सुमार दर्जाचे आहेत, ही बाब खचितच चिंताजनक आहे.- डॉ. अशोक ढवण, माजी कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.आयसीएआरसारख्या संस्थेतील सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांना डावलले जाते, हा काय प्रकार आहे. आयसीएआरमधील प्रमुख शास्त्रज्ञ, संचालक यांना पूर्वीही आपण पात्र केले आहे. मुळात कुलगुरू शोध समितीतील एक सदस्य तर ॲग्रिकल्चरशी संबंधित नाहीत, ते शास्त्रज्ञही आहेत की नाही, माहीत नाही. माझ्याकडे काही उमेदवारांनी व्यथा मांडल्या. त्यांना राज्यपालांकडे तक्रार द्यावी, असे मी म्हटले आहे. -डॉ. सी. डी. मायी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, माजी अध्यक्ष, शास्त्रज्ञ निवड मंडळ .आयसीएआरमधून मी स्वतः निवडलो गेलो आहे, मग आताच का आयसीएआरमधून आलेल्यांना अपात्र ठरवता, त्यांना मुलाखतीला बोलवा, नंतर ठरवा काय ते, पण त्या आधीच त्यांना बाजूला करता, यामागे काही उद्दिष्ट आहे का, असा संशय येतो. पण जे चाललेय ते चुकीचे आहे.- डॉ. किसन लवांडे, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.