Kolhapur News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशाअंतर्गत साखर बाजार तेजीत स्थिर आहे. व्यापारातील मागणी तुलनेने स्थिर राहिल्यामुळे मोठे चढउतार दिसले नाहीत. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील घाऊक बाजारांमध्ये साखरेचे दर ३७५० ते ३८२० रुपये प्रति क्विंटल दरम्यान नोंदवले गेले. दिल्ली, मुजफ्फरनगर आणि लखनौ बाजारांतही चागंला दर मिळत आहे. .दिल्लीत साखरेचा दर ३७०० ते ३७८० रुपये प्रति क्विंटल असा होता. काही व्यापाऱ्यांनी हलकी वाढ नोंदवली असली, तरी मागणी अजूनही मध्यम स्वरूपाची असल्याचे सांगितले. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांतील साखर बाजार तुलनेने स्थिर राहिले. बेंगलोर आणि चेन्नई येथील बाजारांत दर ३७६० ते ३८४० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान होते..Sugar Industry: साखर कारखान्यांची यांत्रिक कामेही ‘एआय’ सांभाळणार.अनेक कारखान्यांनी आठ दिवसांपूर्वीच दर वाढत असल्याचे पाहून साखरेच्या विक्रीला प्राधान्य दिले होते. देशात जेमतेम साखरेचा साठा व दिवाळीमुळे दर खाली येणार नाहीत हे पाहून कारखान्यांनी साखर विक्री केली. .Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’कडून खोडवा उसास १०० रुपये प्रतिटन अनुदान.महाराष्ट व कर्नाटकात एक नोव्हेंबरनंतर नवी साखर बाजारात येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात हंगाम सुरू झाला असला तरी तेथील कारखाने अद्याप जुनी साखरच बाजारात आणत आहेत. .यामुळे दिवाळी होईपर्यंत तरी साखरेचे दर स्थिर रहातील किंबहुना त्यात हलकी का होईना वाढच अपेक्षित असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. एक महिन्यापासून देशात साखरेचे दर सातत्याने ३५०० रुपयांवर ४००० रुपयांपर्यंत गेले आहेत. आक्टोबरअखेर पर्यंत तरी साखरेच्या बाजारात फारशी पडझड शक्य नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.