Kolhapur News : कर्नाटकने महाराष्ट्र सीमाभागातील ऊस तोड करण्यासाठी ‘गनिमी कावा’ करीत कर्नाटकच्या साखर हंगाम सुरू करण्याची तारीख २० ऑक्टोबर (सोमवार) केली आहे. याचा फटका सीमाभागातील महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांना बसणार आहे. महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबरपासून ऊस तोडीस परवानगी दिली आहे. यामुळे या तारखेपर्यंत राज्यातील कारखाने ऊस तोडू शकणार नाहीत. पण कर्नाटकचे कारखाने महाराष्ट्रातील ऊस तोडू शकणार असल्याने कारखान्यांना जबर फटका बसणार आहे..ऐन दिवाळीत कर्नाटकने तिरकी चाल खेळत यंदाच्या हंगामाच्या प्रारंभीच महाराष्ट्रातील कारखान्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकने जर लवकर हंगाम सुरू केला तर दररोज महाराष्ट्रातील सव्वा लाख टन ऊस कर्नाटकातील कारखान्यांना जाणार आहे. मंत्री समितीने हा प्रकार लक्षात घेऊन गाळपास लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. .Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगामाची तारीख २९ सप्टेंबरला जाहीर होणार .पश्चिम महाराष्ट्रात एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आणि दुसरीकडे कर्नाटकच्या निर्णयामुळे सुरुवातीलाच गाळपाचे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीच कर्नाटकात महाराष्ट्रातून सुमारे ४५ लाख टन ऊस गेला होता. या वर्षी दोन्ही राज्यांचा हंगाम एकाच दिवशी सुरू होणार असल्याने उसाची पळवापळवी होणार नाही, अशी शक्यता होती. पण पुन्हा कर्नाटकने महाराष्ट्राच्या हंगामापूर्वी दहा दिवस अगोदरच हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेत आपला इरादा स्पष्ट केला आहे..Sugarcane Season : उसाला चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा.महाराष्ट्रातील उत्पादक कर्नाटककडे वळण्याची भीतीकर्नाटकातील बेळगाव, विजयपूर, बागलकोट, गदग, यादगिरी, बेल्लारी, विजयनगर, दावणगेरे आणि हावेरी जिल्ह्यांतील साखर कारखाने गाळप सुरू करू शकतील. येथील कारखाने या वर्षी दहा दिवस आधी सुरू होत असल्याने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जास्त भाव आणि लवकर गाळपाच्या आशेने कर्नाटकातील कारखान्यांकडे वळतील, अशी भीती आहे..क्षमता वाढविलेल्या कारखान्यांना बसणार फटकामध्यंतरी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास ही बाब आणली होती. मंत्री समितीच्या बैठकीतही कर्नाटकबरोबर हंगाम सुरू करा, असे ठरले होते. कर्नाटकने मात्र महाराष्ट्रातील उसावर डोळा ठेवत हंगामाच्या नियोजित तारखेत बदल करत ती आत आणली. यामुळे नियोजनाच्या पातळीवर कारखान्यांची कसरत होणार आहे..अनेक कारखान्यांनी गाळपाची क्षमता वाढवली आहे. क्षमता वाढवूनही गेल्या वेळी अपेक्षित गाळप झाले नव्हते. यंदा जर कर्नाटकला ऊस गेला तर कारखान्यांना कमी क्षमतेवर कारखाने सुरू ठेवण्याची वेळ येणार आहे. दिवाळीनंतर मजुरांना तातडीने बोलावून हंगाम सुरू करण्याचे आव्हान पुढे ठाकले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.