Rice Export : एक हजार टन बिगर-बासमती पांढरा तांदूळाच्या निर्यातीस केंद्राची मान्यता; नामिबियाला जाणार भारताचा तांदूळ

Non-Basmati White Rice : केंद्र सरकारने मलावी आणि झिम्बाब्वे देशांना २००० मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली होती. 
Rice Exports
Rice ExportAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशांतर्गत पुरवठा वाढविण्यासाठी २० जुलै २०२३ पासून गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी केंद्र सरकारने घातली आहे. मात्र काही देशांना त्यांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष विनंतीनुसार निर्यात करण्यास मान्यता आहे. यादरम्यान केंद्र सरकारने नामिबिया या देशाला १००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली. याबाबत परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सोमवारी (ता.२९) अधिसूचना काढली. नामिबियाला होणारी निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड (NCEL) मार्फत केली जाणार आहे. 

व्यापार महासंचालनालयाने सांगितले की, एनसीईएल मार्फत नामिबियाला १००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर भारताची बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात एप्रिल-मे मध्ये $१२२.७ दशलक्ष आणि संपूर्ण वर्ष २०२३-२४ मध्ये $८५२.५३ दशलक्ष इतकी होती.

Rice Exports
Export Non Basmati rice : बिगर-बासमती पांढरा तांदळाच्या निर्यातीला परवानगी; अधिसूचना जारी

याआधी केंद्राने काही देशांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठीच्या विशेष विनंतीनुसार बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात केली आहे. यामध्ये नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयव्हरी, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशेल्स सारख्या देशांचा समावेश होतो. 

तर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने २००० मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सरकारने अधिसूचना जारी करत मलावी आणि झिम्बाब्वे या दोन आफ्रिकन देशांना बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात करण्यास परवानगी दिली होती. तसेच मलावी आणि झिम्बाब्वेला होणारी निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड (एनसीईएल) मार्फत केली जाईल असेही डीजीएफटीने आपल्या अधिसूचनेत म्हटले होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com