Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस

Monsoon Rain : जुलै अखेरीस झालेल्या पावसानंतर पुन्हा एकदा काही दिवस पावसाचा खंड पाहायला मिळाला.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत अनेक दिवसांच्या खंडानंतर बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत काही ठिकाणी तुरळक, हलका, तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला.

जुलै अखेरीस झालेल्या पावसानंतर पुन्हा एकदा काही दिवस पावसाचा खंड पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १२, पैठणमधील ११, गंगापूरमधील ९, वैजापूर, सोयगाव व फुलंब्रीमध्ये प्रत्येक एका मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील उस्मानपुरा, आपेगाव, विहामांडवा, पैठण, भेंडाळा मंडळातील पाऊस थोडा दखलपात्र राहिला.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात चार, मंठा व बदनापूर तालुक्यातील प्रत्येकी दोन व अंबड तालुक्यातील चार मंडळांत तुरळक हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील रोहिलागड मंडळात १३.३ मिलिमीटर झालेला पाऊस सर्वाधिक राहिला. बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता.

जिल्ह्यातील बीड व गेवराई तालुक्यातील प्रत्येकी नऊ मंडळात, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार तालुक्यातील प्रत्येक दोन, माजलगाव, अंबाजोगाई, परळी तालुक्यातील प्रत्येकी पाच, धारूरमधील तीन तर केजमधील सात मंडलांत तुरळक हलका मध्यम पाऊस झाला.

जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंबा, धोंडराई, गंगामसला, किट्टी आडगाव, दिंद्रुड, अंबाजोगाई, पाटोदा, लोखंडी सावरगाव, धर्मापुरी, रायमोहा आदी मंडलांतील पावसाचे हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपाची होती.

दरम्यान, बुधवारी सकाळच्या सत्रातही आठ दिवसांच्या खंडानंतर मेघ गर्जनेसह अंबाजोगाईत पाऊस सुरू होता. बर्दापूरात पंधरा ते वीस मिनीट पाऊस झाला. परळीत रिमझिम पाऊस झाला. शिरूरकासार तालुक्यात काही मंडळात रिमझिम पाऊस झाला. केज तालुक्यात सकाळपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले तर रिमझिम पाऊस पडत होता. किल्लेधारूर रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी

Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च

Fertilizer Supply: परभणी जिल्ह्यात खरिपासाठी एक लाख ६१ हजार टन खतांचा पुरवठा

Tribal Economy: मोहाच्या फुलांमुळे स्थानिक अर्थकारणाला बळ

Drought Management Committee: जिल्हास्तरीय ‘दुष्काळ व्यवस्थापन समिती’ची नव्याने रचना

SCROLL FOR NEXT