
Sangali News: जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत जुलै महिन्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र यंदाच्या जुलै महिन्यात ११७.२ मिलिमीटर म्हणजे ८६.४९ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात १६६.४ मिलिमीटर म्हणजे १२३.११ टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यात पावसाने सरासरीही गाठली नसली तरी, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने दुष्काळी भागातील खरीप हंगाम काहीसा धोक्यात आला असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांत जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडतो. तर शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी होते. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते. कृष्णा आणि वारणाकाठची शेती पाण्याखाली जाते. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
जुलै महिन्याचा सरासरी पाऊस १३५.५ मिलिमीटर इतका आहे. गतवर्षी २८३.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून त्याची टक्केवारी २०९.६ होती. अर्थात, ३१ दिवसांपैकी २२ दिवस पाऊस झाला होता.यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यातही सरासरी इतका पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला.
मध्यानंतर काहीचा पावसाचा जोर वाढला. परंतु पावसाची रिमझिम सुरू असल्याने दुष्काळी तालुक्यातील पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. यंदाच्या जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात झाला आहे. शिराळा तालुक्यात ३९०.५ मिलिमीटर म्हणजे १२७ टक्के इतका पाऊस नोंदवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये १२३.११ टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे.
खरीप हंगाम धोक्याच्या दिशेने
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर या दुष्काळी तालुक्यांत कमी अधिक पावसाने हजेरी लावली आहे. जत तालुक्याचा सरासरी पाऊस ७०.१ मिलिमीटर इतका असून ७४.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वास्तविक पाहता, अवघा पाचच दिवस पाऊस झाला आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागात खरीप हंगाम काहीसा धोक्यात आला आहे. तर इतर तालुक्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील खरीप हंगाम संकटात आला असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत जुलैमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटर)
वर्ष पडलेला
पाऊस पावसाचे दिवस टक्केवारी
जुलै २०२० ११७.७ १६ ८६.८६
जुलै २०२१ ३२१.४ २२ २३७.१९
जुलै २०२२ १९७.९ २० १४६.०५
जुलै २०२३ १७२.१ २१ १२७.०१
जुलै २०२४ २८३.६ २२ २०९.६
जुलै २०२५ ११७.२ १८ ८६.४९
जिल्ह्याचा जुलै महिन्याचा सर्वसाधारण पाऊस १३५.५ मिलिमीटर.
गेल्या चार वर्षांत जुलै महिन्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद.
३१ दिवसांपैकी १६ ते २२ दिवस पाऊस.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.