Nashik News : यंदा मान्सूनपूर्व पाऊस व नंतरच्या टप्प्यात मॉन्सून जिल्ह्यात दाखल झाल्यापासून पाऊस बरसत आहे.त्यामुळे जूनपासूनच पाणीसाठ्यात वाढ झाली. अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र काही ठिकाणी अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत.
काही ठिकाणी तर ओल्या दुष्काळाचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. परिणामी पाऊस थांबण्याची प्रतिक्षा होती. अखेर गुरुवार (ता. १०) रोजी जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. सततच्या पावसामुळे शेतीकामात सातत्याने व्यत्यय येत होता. अशातच चालू जुलै महिन्यात पावसाने १० दिवसानंतर उघडीप दिली आहे. ज्यामध्ये सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, चांदवड तालुक्यात हा तुरळक हलक्या सरी झाल्या.
मात्र इतर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.जून महिन्याची सरासरी १७४ मिमी असताना प्रत्यक्षात २२३ मिमी पाऊस झाला. येथे १२८ टक्के पर्जन्यवृष्टी झाली. जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत सरासरीच्या ९८ टक्के म्हणजेच ९७ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
यंदा जून व जुलै महिन्यातच अनेक नद्या व नाले दुथडी वाहिले.त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक छोटे व मोठे बंधारे भरले आहेत.त्यामुळे तुर्तास पाण्याचे संकट टळले आहे. आता पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील विसर्ग गेल्या तीन दिवसांपासून टप्प्याटप्याने घटविण्यात आला आहे.
ज्यामध्ये जिल्ह्यातील ९ धरणांतून विसर्ग सुरू आहे.दारणा धरण वगळता इतर ८ धरणांतून विसर्ग १,००० क्युसेक्सच्या आत आहे. पालखेड धरणातून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे.
संततधार पावसामुळे शेतीकाम खोळंबली होती. आता पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा कामांना गती येण्याची चिन्हे आहेत.मात्र काही ठिकाणी वाफसा होण्याची प्रतीक्षा आहे. अनेक भागात ओल्या दुष्काळाचे सावट आहे.
धरणातील विसर्ग असा
धरण विसर्ग (क्युसेक्स/ता.११ रोजी दुपारी१२)
दारणा ११००
गंगापूर ४४१
पुणेगाव ५५०
भोजापूर ७६
भावली २०८
भाम ९९७
वालदेवी २४१
आळंदी ८७
करंजवन ३१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.