Khandesh Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Weather News : घाटमाथा, पूर्व विदर्भात सरी

Weather Update : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर मंदावला आहे. घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. ७) पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Rain Update : पुणे : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर मंदावला आहे. घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. ७) पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत गोंदियातील चिंचगड येथे १०८ मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील धरणांत पाण्याची आवक सुरू असून लहान, मोठ्या जवळपास ४५ धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्या भरून वाहत आहेत.

मागील काही दिवसांपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. कोयना घाटमाथ्यावर ९४ मिलिमीटर, तर दावडी घाटमाथ्यावर ७६ मिलिमीटर पाऊस पडला. लोणावळा येथे ४७, शिरगाव ५६, आंबोणे ४७, ताम्हिणी ५६, तर भिरा येथे ४५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणांतील येवा सुरू आहे. त्यामुळे विसर्ग कमी-अधिक प्रमाणात करण्यात येत आहे.

कोकणातील रायगडमधील मोराबी येथे ४२, कर्जत ३२, कळंब ३७, चौक, पेण ३४, जांभूळपाडा ५७, कसू ४४, कामरली येथे ३३ मिलिमीटर, तर रत्नागिरीतील कडवी येथे ३७, मुरडव, माखजन ३४, फणसवणे, तेर्ये येथे ३७, सिंधुदुर्गमधील पोइप येथे ३५, बांदा, आजगाव ३५, आंबोली, तळवट ३४, मडूरा ६०, कुडाळ ३७, कसाल ३१, वालावल येथे ३३ मिलिमीटर पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. कोल्हापुरातील गगनबावडा येथे ४१ मिलिमीटर पाऊस झाला.
मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि
गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस पडला. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत सर्वदूर हलका
पाऊस आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT