Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Hingoli Rain : परभणी, हिंगोलीत पावसाचा कहर

Team Agrowon

Parbhani News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत रविवार (ता. ३१) पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता. २) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ८० मंडलांत अतिवृष्टी झाली. या दोन जिल्ह्यांतील ५५ मंडलांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. ७ मंडलांत २०० मिलिमीटर पाऊस झाला. तर एका मंडलात ३१४ मिलिमीटरपेक्षा पाऊस झाला. गेल्या २४ तासात परभणी जिल्ह्यात सरासरी १३८.४ मिलिमीटर तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १३९.९ मिलिमीटर पाऊस झाला.

गोदावरी, पूर्णा, दुधना, कयाधू, करपरा, इंद्रायणी, थुना आदी नद्यांना पूर आले. नद्या तसेच ओढे नाल्यांच्या पुरामुळे जमिनी खरडून गेल्या असून हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, हळद आदींसह भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.घरांची पडझड, शेतातील आखाडे, ठिबक संच, सौर कृषिपंप पॅनेलचे नुकसान झाले. पूरामध्ये कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी पिंगळी (५६ मिमी) व पूर्णा (३२ मिमी) ही २ मंडळे वगळता इतर ५० मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. ३० मंडलांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा जास्त, ५ मंडलांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त तर १ मंडलांत ३१४ मिलिमीटरपेक्षा जास्त तर १४ मंडलांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी १५९.२ मिमी तर १ जूनपासून आजवर ७१८.७ मिमी पाऊस झाला.हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत अतिवृष्टी झाली.जिल्ह्यातील २ मंडलांत २०० मिमीपेक्षा अधिक २५ मंडलात १०० मिमीपेक्षा अधिक, ३ मंडलांत ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आजवर सरासरी १७३.९ मिमी तर १ जूनपासून आजवर सरासरी ७४९.६ मिमी पाऊस झाला.

परभणी जिल्हा मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

३०० मिमीपेक्षा जास्त : पाथरी ३१४.

२०० मिमीपेक्षा जास्त : वालूर २४६, मानवत २५६,केकरजवळा २०७, रामपुरी २०३.८, बाभळगाव २७७.

१०० मिमीपेक्षा जास्त : परभणी शहर १०८.८, पेडगाव १४४.५, झरी १२०.३, टाकळी कुंभकर्ण ११८.८, जिंतूर १६९.८, सावंगी म्हाळसा १७९, बामणी १७७, बोरी १३१.८, आडगाव १४८.३, चारठाणा १६६, वाघी धानोरा १६६, दूधगाव १२६.८, सेलू १४८.५, देऊळगाव गात १९५.५, कुपटा १४४.५, चिकलठाणा १८४, मोरेगाव १६८.८, कोल्हा १६७.५, ताडबोरगाव १५४.८, हादगाव १३७.३, कासापुरी १८९, सोनपेठ १७१, आवलगाव १५६.७, शेळगाव १५६.७, गंगाखेड १०५.५, महातपुरी ११०.३, माखणी १०५.३, पालम ११९.५, पेठशिवणी १२२.३, ताडकळस १०६.८.

६५ मिमीपेक्षा जास्त : परभणी ग्रामीण ९०.५, जांब ९८.८, सिंगणापूर ९१.८, दैठणा ९५, वडगाव ८४.३, राणीसावरगाव ८५.८, पिंपळदरी ९७, चाटोरी ९३.५, बनवस ७१.८, रावराजूर ९५, लिमला ७७, कात्नेश्वर ६८.५, चुडावा ७५.५, कावलगाव ७७.५.

हिंगोली जिल्हा

२०० मिमी पेक्षा जास्त : हिंगोली २२५ मिमी, बासंबा २२५ मिमी.

१०० मिमीपेक्षा जास्त : नरसी नामदेव १५३.३, सिरसम १४९, दिग्रस कऱ्हाळे १८६.९, माळहिवरा १४९, खंबाळा १५९, कळमनुरी १५२, वाकोडी १५४.५, नांदापूर १६४, आखाडा बाळापूर १०६.५, डोंगरकडा ११२.३, वारंगा ११२.३, वसमत ११५.५, आंबा १३९.३, गिरगाव १५८.५, हट्टा ११०.३, टेंभुर्णी १०३.३, कुरुंदा १११.५, औंढा नागनाथ १४२.८, येळेगाव १८६.९, साळणा १४५.३, जवळा बाजार ११९, सेनगाव १२४.३, साखरा १३३.८, पानकन्हेरगाव १३४.५, हत्ता १६९.८.

६५ मिमीपेक्षा जास्त : हयातनगर ८५.८, गोरेगाव ८६, आजेगाव ८०.३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT