Heavy Rain : नांदेड, यवतमाळमध्ये पावसाचा दणका

Rain Update : मराठवाडा आणि विदर्भात दमदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांना मुसळधार पावसाने जोरदार दणका दिला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाडा आणि विदर्भात दमदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांना मुसळधार पावसाने जोरदार दणका दिला आहे. रविवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सिंदगी येथे सर्वाधिक १७८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे शेतात पाणी तुंबल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून नद्यांना पूर आला होता.

मराठवाड्यात दोन जिल्ह्यांत मुसळधार

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. नांदेड जिल्ह्यातील ६३ पैकी २६ मंडलांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

Heavy Rain
Monsoon Rain : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जिल्ह्यामध्ये चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. दहा वाजेपर्यंत १३६ मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडलांत पावसाचा जोर अधिक आहे. किनवट पाठोपाठ हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे.

नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाण्याचे आज टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर कापूस, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हिंगोलीत जोरदार पावसामुळे औंढा नागनाथ शिवारातील कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे हिंगोली नांदेड महामार्गावरील डोंगरगाव (ता. कळमनुरी) येथील कयाधू नदीला पूर आला आहे.

पूर्व विदर्भात जोरदार पाऊस :

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून ओढे, नाले भरून वाहू लागले आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली.

तर अकोला, वाशीम,वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत कमीअधिक स्वरूपात पाऊस झाला. अकोल्यातील अडगाव येथे ४० मिलिमीटर, भंडाऱ्यातील धारगाव, खामारी, कर्डी येथे ५७ मिलिमीटर गोंदियातील परसवाडा येथे ५८ मिलिमीटर, तर तिरोडा ५३, मुंडीकोटा ६४, महागाव ६१ मिलिमीटर, वाशीमधील मानोरा ५४, उमरी ७३ मिलिमीटर पाऊस झाला.

कोकणात तुरळक सरी :

कोकणात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे भात खाचरातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, अधूनमधून पडत असलेल्या सरीमुळे पिकांना दिलासा मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील वसींड येथे अवघा २० मिलिमीटर पाऊस झाला. तर रत्नागिरीतील चिपळूण, खेर्डी, कळकवणे, धामणंद, रत्नागिरी, कोंडगाव, राजापूर, सिंधुदुर्गमधील मालवण, आबेरी, मडूरा, वेंगुर्ला, म्हापण, वेतोरे, वालावल, वैभववाडी, भुईबावडा येथे तुरळक सरी पडल्या.

Heavy Rain
Rain Update : पावसाची उसंत, शेतीकामांनी घेतला वेग

मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण :

मध्य महाराष्ट्रात पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण कायम आहे. तर अधूनमधून शिडकावा होत आहे. खानदेशातील धुळे जिल्ह्यातील बोराडी, सांगवी, जळगावमधील जळगाव, पिंप्राळा, भोकर, भुसावळ, कुऱ्हे, भालोद, साकळी, सावदा, गोरगावले, चोपडा, पाळधी येथे तुरळक हलक्या सरी पडल्या. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूरातील मुस्ती, अक्कलकोट, जेऊर, दुधनी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी, सांगलीतील बुधगाव, मिरज, सांगली, मालेगाव, कवलापूर, भोसे, कुपवाड, विसापूर, मनेराजुरी, तासगाव, खरसुंडी, देशीग, कवठेमहांकाळ, हिंगणगाव, भिलवडी, कोल्हापुरातील गगनबावडा, कडगाव येथे तुरळक सरी बरसल्या. त्यामुळे धरणांत आवक काहीशी कमी झाली आहे.

येथे झाला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

किनवट १४०, ईस्लापूर १६५, जलधारा १३८, शिवणी १०२, मांडवा १५३, दहेली ११२, सिंदगी १७८, उमरी बाजार १६०, आष्टी ११२, जवळगाव ११८, सरसम १११, माहूर ११७, बाभूळगाव १४७, घारफळ ११८, कळंब १०७, पिंपळगाव १६०, सावरगाव १६१, दिग्रज, कळगाव, तिवरी, तूप ११३, दराटी, झाडगाव १०७, महागाव, मोरथ १०२, गुंज १०५, राजूर ११९, उमरखेड ११६, गणेशपूर १३९, पांढरकवडा ११५, मुकुटबन १०९, पाहापळ, केळापूर, कुपटी ११५, पारवा धानोरा १०४, विजय गोपाल १०३, अंदोरी ११८, गिरोली, कानदगाव १०५.

रविवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः कृषी विभाग)

मराठवाडा : मातोळा ४६, बेलकुंड ५१, उमरगा ६१, डाळिंब ९४, मुरूम ५४, माकणी ८८, नांदेड शहर ४७, नांदेड ग्रामीण ४३, तुप्पा ४५, वसरणी ५१, विष्णुपुरी ४१, लिंबगाव ४७, तरोडा ४४, वाजेगाव ४४, बिलोली ४१, अदमपूर ४०, लोहगाव ४१, माळाकोळी ४३, हदगाव, तळणी ७८, निवघा ६५, मनाठा ७२, तामसा ८२, पिंपरखेड ७३, भोकर ६२, मोघाळी ५६, मातूळ ५१, किणी ९५, बोधडी ८१, मुदखेड ६६, मुगट ४९, बारड ५७, हिमायतनगर ८०, वानोळा ७६, वाई ८८, सिंदखेड ९१, गोळेगाव ५१, सिंधी ५४, धानोरा ५०, अर्धापूर ७२, कुंटूर ५५, बनवस ४८, सिरसम, माळहिवरा ५०, कळमनुरी ५५, वाकोडी ७९, आखाडा बाळापूर ७२, डोंगरकड, वारंगा फाटा ५३, गिरगाव ५६.

विदर्भ : यवतमाळ ८२, कोपरा ७८, हिवरी ५३, अर्जुना ५१, येळबारा ५२, कोळंबी ५१, सावरगड ८२, मोहा ८७, लोहारा ६७, वेणी ७७, सावर ८३, कोठा ९५, जाडमोहा ७५, मेटिखेडा ९४, चिखली, लोही ५६, बोरी ६०, लडखेड, महागाव ६९, जवळा ८१, अर्णी ८४, लोनबेहल ६७, सावळी ९१, बोरगाव ८४, अंजनखेड ६७, नेर ५०, माणिकवाडा ८३, मोझर ५०, वाटफळी ८३, पुसद ६०, गौळ ९८, शेंबळ ९०, खंडाळा ६५, ब्राह्मणगाव, जांब ५१, वरूड ९०, बोरी ९५, मुळवा ८६, विडूल ९९, चाटरी, धानकी ६८, बितरगाव ९७, निगनूर ८२, कळी ७३, हिवरा ९१, फुलसावंगी ९८, कासोळा ९७, शिंदोळा ९८, रसा ७३, मारेगाव, मार्डी, कुंभा ६७, वानोजा ७२, बोटोनी ६५, झरी, खडकडोह ६६, मथार्जून ७०, शिबला ७८, पाटणबोरी ८६, चालबराडी ७६, करंजी ६५, रुंजा ८६, घाटंजी ५२, शिरोली ८४, साखरा ५२, शिवणी ६५, घोटी ९९, राळेगाव ७३, वाढोणा ९१, वडकी ८०, वरध ८६, किन्ही ९०, वायफड ५९, तळेगाव ७६, देवळी ६८, पुलगाव ८५, भिडी ८६, हिंगणघाट ५४, सावळी ५७, वडनेर ५८, पोन्हा ५३, अल्लीपूर ७६, सिरसगाव ८०, निंदोरी, कोरा ७२, घुगस ७८, वरोरा ५५, माधेली ५९, तेमुर्डा ६९, खांबडा ५८, चिकणी ६९, भद्रावती ५१, नांदोरी ५६, चांदनखेडा ५५, कोपर्णा ६६, गडचांदूर ५४, पाटण ५८.

पाऊस दृष्टिक्षेपात...

- कोकणात अधूनमधून सरी.

- खानदेश, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शिडकावा.

- मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस.

- नांदेड जिल्ह्यातील सिंदगी येथे सर्वाधिक १७८ मिलिमीटर पाऊस.

- विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मध्यम ते जोरदार सरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com