Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : बहरलेल्‍या भातपिकाचे पावसामुळे नुकसान

Heavy Rain Crop Loss : बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने बुधवारी (ता. ९) दुपारी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.

Team Agrowon

Uran News : बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने बुधवारी (ता. ९) दुपारी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे भात खाचरातील भातपिके शेतात साचलेल्या गुडघाभर पाण्यात आडवी झाली आहेत.

त्यामुळे उरण तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, सर्वत्र सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात पावसाचा व्यत्यय ठरत असून गरबाप्रेमींमध्येही नाराजी आहे. सध्या उरण तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी भातशेती कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे कुठे कापणी; तर कुठे भाताची मळणी सुरू आहे.

आदिवासी वाड्यांमध्येही नाचणी, वरीची कापणी सुरू आहे; मात्र बुधवारी अचानक ऐन कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने मेहनत वाया जात असून शेतकरी चिंतेत आहेत. या भागात बऱ्याच ठिकाणच्या भात खाचरातील पीक पूर्णपणे तयार झाले आहे; तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.

ज्या भात खाचरात पिके तयार झाली आहेत, अशी पिके शेतकऱ्यांनी कापून शेतात सुकवायला ठेवली आहेत. काही ठिकाणी भाताची मळणी सुरू आहे; परंतु अचानक पाऊस आल्यामुळे कापलेले भात भिजून गेले आहे; तर न कापलेले भातसुद्धा आडवे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे.

हस्त नक्षत्राच्या पावसामुळे भातपिके आडवी झाली आहेत. पाऊस वेळीच थांबला नाही तर पडलेले भात कुजून जाण्याची भीती आहे. भात लावणीपासून आमच्यावर नैसर्गिक संकटे येतच आहेत.
- दीपक पाटील, शेतकरी, चिरनेर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

OTS Scheme : सातारा जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा: तब्बल ५,५७८ शेतकरी ‘ओटीएस’ योजनेसाठी पात्र!

Farm Of The Future : कृषी क्षेत्रात मोठी क्रांती: ब्राह्मणीत साकारणार आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘फार्म ऑफ द फ्युचर’!

Land Investment : विकासाचा महामार्ग: 'बायपास'नजीक शेतजमिनींच्या दरांना सोन्याचा भाव; गुंतवणूकदारांची मोठी गर्दी!

Sugar Mills Maharashtra: गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या घटली; उपाययोजना सूचविण्यासाठी समिती स्थापन

Guava Market : सोलापूर बाजार समितीत पेरूचा गोडवा; दररोज तब्बल एक हजार क्रेटची विक्रमी आवक!

SCROLL FOR NEXT