Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain : घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळत आहे.गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी घाटमाथ्यावर सर्वाधिक १७२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

जिल्ह्यातील ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस झाल्याने मुळशी आणि आंध्रा, लोणावळा, वळवंड, शिरवठा अशी धरणे जवळपास भरत आली आहेत. तर मुठा, नीरा, कुकडी खोऱ्यातील धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. पूर्व भागात पावसाच्या अधूनमधून सरी पडत असल्या तरी पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे.

त्यामुळे टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला ही चारही धरणे जवळपास भरली असून, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गुरुवारी सकाळ आठ वाजेपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात ८० मिलिमीटर, तर वरसगाव ७५, पानशेत ६८, खडकवासला २१ मिलिमीटर पाऊस झाला.

पवना धरणक्षेत्रात ८६ मिलिमीटर, तर वडिवळे ६१, नीरा देवघर धरणक्षेत्रात ५४, तर गुंजवणी ४५, भाटघर २९, कळमोडी २६ मिलिमीटर पाऊस झाला. तर कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे धरणक्षेत्रांत हलका पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT