Ujani Dam water storage
Ujani Dam water storageagrowon

Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत १३० टीएमसी पाणीसाठा

Pune Rain : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा ओसरला
Published on

Pune Dam News : गेले चार ते पाच दिवस जिल्ह्याच्या काही भागांत दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर सोमवारी (ता.२९) पावसाचा जोर ओसरला. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धरणांत ८.४० टीएमसी एवढ्या नवीन पाण्याची आवक झाली असून, एकूण उपलब्ध साठा १३०.३३ टीएमसी म्हणजे ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मागील काही दिवस धरणक्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भातखाचरे भरून वाहू लागली असून ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात जवळपास २६ टीएमसीपर्यंत एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

घाटमाथा आणि धरणक्षेत्रांत हलका पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक सुरूच आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. परंतु पावसाचा जोर मंदावल्याने सोमवारी धरणांतील पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे.

Ujani Dam water storage
Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत दोन दिवसांत ४४ टीएमसी पाणी

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथ्यांवर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तर, शिरोटा या घाटमाथ्यावर ४४ मिलिमीटर पाऊस पडला. मुळशी घाटमाथ्यावर १०८, वळवण ३७, लोणावळा २९, ठोकरवाडी २३, कुंडली २० मिलिमीटर एवढा पाऊस पडला. दरम्यान, मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत या सर्वच धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाला.

खडकवासला धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या. नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, गुंजवणी, नीरा देवघर, भाटगर, वीर या धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाला असून नाझरे, कासारसाई, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर धरणक्षेत्रांत तुरळक सरी पडल्या. उजनी धरणक्षेत्रात पावसाची उघडीप होती. त्यामुळे खरिपातील पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

एक जून ते २९ जुलैपर्यंत धरण क्षेत्रनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर २३०४, वरसगाव १४२८, पानशेत १४२२, खडकवासला ५३८, पवना १८९२, कासारसाई ७१८, कळमोडी ८९१, चासकमान ५८७, भामा आसखेड ७३६, आंध्रा ८३८, वडिवळे १९४३, शेटफळ १७४, नाझरे ३५७, गुंजवणी १५८२, भाटघर ६४१, नीरा देवघर १२९७, वीर २५८, पिंपळगाव जोगे ३०४, माणिकडोह ३५५, येडगाव ३६६, वडज ३३२, डिंभे ५८५, चिल्हेवाडी ३६५, घोड ३१३, विसापूर १४१, उजनी २७०, मुळशी ३९३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com