Maharashtra Politics agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Rahul Gandhi Priyanka Gandhi Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी टिळक भवन मुंबई येथे गुरूवारी (ता.०७) झालेल्या बैठकीत माहिती दिली.

चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.

चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार करावा असे आवाहन चेन्नीथला यांनी केले.

१० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयात मध्ये महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित असतील असेही चेन्नीथला यांनी सांगितलं.

या पत्रकार परिषदेला, माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, एसएसी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI Chatbot Kisan e Mitr : शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत मदत, रोज हजारो प्रश्नांची उत्तरे, काय आहे ‘किसान ई-मित्र’?

Lakshmi Mukti Scheme: मोफत करा महिलांच्या नावावर सातबारा; सरकारची महिला सक्षमीकरणासाठी लक्ष्मी मुक्ती योजना

Tractor Sales : जीएसटी कपातीमुळे ट्रॅक्टर खरेदी नवरात्रीनंतर गती घेणार?

Pulses Import Policy : आयातीवर ५० टक्के शुल्क लावण्याची उद्योगांची मागणी; पिवळा वाटाण्याने पाडले तूर, मसूर, हरभऱ्याचे भाव

Urea Shortage : आंध्र प्रदेशमध्ये युरिया टंचाई नाही; मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा दावा, वायएसआरवर केली टीका

SCROLL FOR NEXT