Namo Shetkari payment: राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी दिली आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढील आठवड्यात ‘नमो’चा आठवा हप्ता जमा होईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये दिली आहे..नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता ९० लाख ३४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर प्रत्यक्ष वितरण १ हजार ८२० कोटी रुपयांचे करण्यात येईल, असे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले आहे..Namo Shetkari 8th Installment : नमोचा आठवा हप्ता पुढच्या आठवड्या जमा होणार; दोन हजार रूपये बँक खात्यावर येणार.राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ता गुढीपाडव्याच्या दिवशी जमा करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सलग सुट्ट्या असल्याने वितरण पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे २३ मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमोचा हप्ता जमा करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे..Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची शेतकरी मागील दोन महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत. पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यासोबतच नमोचा हप्ता वितरित होणे अपेक्षित होते. परंतु कृषी विभागाने निधीसाठी प्रस्ताव पाठवूनही वित्त विभागाने निधीला मंजुरी दिली नव्हती. अखेर सोमवारी या हप्त्याच्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आली. परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यासाठी एक आठवडा वाट बघावी लागणार आहे..दरम्यान, राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये तीन टप्प्यांत दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे. सातवा हप्ता सप्टेंबर २०२५ मध्ये जमा करण्यात आला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.