Ragi Crop agrowon
ॲग्रो विशेष

Ragi Crop : पावसाने नाचणीला पिकास फटका; उत्पादनावर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भिती

sandeep Shirguppe

Kolhapur Ragi Production : कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, चंदगड, भुदरगडसह डोंगरी भागातील तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाबरोबर नाचणी पिकाची शेती केली जाते. परंतु पावसाच्या रोजच्या हजेरीमुळे राधानगरी, चंदगड, आजरा तालुक्यातील बागायतीसह डोंगरी पिकांचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे. खरिपाच्या नाचणी (नागली) पिकावर आणि गवतावर मोठा परिणाम झाल्याने यंदा नाचणी पिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या माऱ्याने नाचणी पीक जमीनदोस्त झाले आहे. रोजचा पाऊस शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवू लागला आहे. शिवारात कापणी योग्य झालेले भात भुईसपाट होऊन त्याच्या दाण्यांना मोड येऊ लागले आहेत.

यंदा चांगला पाऊस आणि योग्य हवामानामुळे तरारून आलेले नाचणी पीक समाधानकारक आहे. नाचणीची बोंडे भरली आहेत. कडक उन्हात आठ पंधरा दिवसांत ते काढणी योग्य पीक होईल, अशी स्थिती असताना या पावसामुळे नाचणी काळी पडण्याची भीती आहे. अशा काळ्या पडलेल्या नाचणीला मागणी कमी असते, दरही कमी येतो. शिवाय खाण्याला ती कडवट लागते. यामुळे हातात आलेले पीकही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तीच स्थिती भुईमुगाची आहे. भुईमूग टच्च भरला आहे. पण, वाफ्यामध्ये पाणी साचल्यामुळे ते कुजून किंवा मोड येण्याची भिती आहे. एकंदरीत अनेक तालुक्यात खरिपाच्या पिकांना या रोजच्या पावसाचा फटका बसू लागला आहे. दरम्यान, पाऊस आणखी काही दिवस लागल्यास डोंगरी गवत ही कुजण्याची भीती शेतकऱ्याला आहे.

सर्वाधिक भात उत्पादन राधानगरी तालुक्यात

राधानगरी तालुक्यात सुमारे अकरा हजार हेक्टरांवर भात पीक आहे. बहुतांश धूळवाफ पेरणी आणि बऱ्यापैकी रोप लागण आहे. मृग नक्षत्राच्या टप्प्यावर या लागवडी झाल्याने आता सुगीचा हंगाम टप्प्यात आला आहे. भात कापणी योग्य झाल्याने आता सुगीला वेग येईल, अशी परिस्थिती असतानाच रोजच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. लोंबीसकट भात भुईसपाट झाल्याने त्या लोंबीतून आता मोड येऊ लागले आहेत. अशा स्थितीत गुडघाभर पाण्यातून असे पीक बाहेर काढून ते घरात वाळवण्याचा आटोकाट प्रयत्न शेतकरी वर्गातून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीच्या दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत आजचे केळीचे दर?

Voter List : अहिल्यानगरमध्ये पाच वर्षांत वाढले पावणेतीन लाख मतदार

Animal Feed : दुभत्या जनावरांसाठी अंजनचा पाला खाद्य

Woman Farmer Award : ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’ देण्याची घोषणा

Excise Department : सोलापुरात उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र-कर्नाटकची समन्वय बैठक

SCROLL FOR NEXT