MPSC Exam Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २१ डिसेंबर रोजी होणारी महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता ४ जानेवारी २०२६ रोजी होईल. तर महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शुद्धीपत्रक 'एमपीएससी'ने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे..महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ चे आयोजन २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ या दरम्यान केले होते. पण राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. यामुळे आयोगामार्फत आयोजित परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर २०२५ रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागवण्यात आली होती..MPSC Update : स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच द्यावी लागणार कागदपत्रे.या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र आणि मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका तसेच परीक्षेच्या आयोजनाकरिता कर्मचाऱ्यांची कमतरता आदी बाबी विचारात घेता परीक्षा आयोजित करण्यात अडचणी उद्भवू शकतात, असे कळवण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन नियोजित तारखेस होणारी परीक्षेच्या तारखा पुढे ढकल्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. .MPSC Success Story: शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश.या परीक्षेची जिल्हा पातळीवर संपर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महसूल विभागावर असते. या दिवशी सर्व कर्मचारी मतमोजणी व्यस्त राहतील. यामुळे या परीक्षेवर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. .परीक्षेच्या सुधारित तारखामहाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५....४ जानेवारी २०२६महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५.............११ जानेवारी २०२६ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.