Annual Monsoon Workshop : मॉन्सूनचा अंदाज सर्वत्र पोहोचण्याची गरज

Pune University Vice Chancellor Suresh Gosavi : दरवर्षी या मॉन्सूनचा अंदाज सर्वत्र पोहोचण्यासाठी भारतीय हवामान सोसायटीने सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
Annual Monsoon Workshop
Annual Monsoon WorkshopAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेती, पिण्याच्या पाण्यासाठी मॉन्सून हा महत्त्वाचा घटक आहे. तो जागतिक स्तरावर वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. दरवर्षी या मॉन्सूनचा अंदाज सर्वत्र पोहोचण्यासाठी भारतीय हवामान सोसायटीने सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय हवामान सोसायटीमार्फत ‘वार्षिक मॉन्सून कार्यशाळा’ या विषयावर सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी (ता. १८) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. गोसावी बोलत होते. या वेळी भारतीय हवामान विभागाचे अध्यक्ष आनंद शर्मा, विभाग प्रमुख यशप्पा कोळेकर, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मुजूमदार, सोसायटीचे माजी अध्यक्ष जीवनप्रकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Annual Monsoon Workshop
Monsoon : देशातून मॉन्सून परतला...

श्री. गोसावी म्हणाले की, मॉन्सून हा विषय महत्त्वाचा आहे. भारतीय अर्थकारण हे मॉन्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे या अभ्यास व अंदाज हा शेतकऱ्यांसाठी तसेच सर्व सामान्य लोकांसाठी फारच महत्त्वाचा आहे. त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. यासाठी आधुनिक संगणक उपलब्ध असून माहिती स्रोत वाढलेला आहे. त्याचा पुरेपुर उपयोग करून घेतला पाहिजे.

Annual Monsoon Workshop
Maharashtra Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

भारतीय हवामान विभागाचे अध्यक्ष आनंद शर्मा म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मॉन्सूनमध्ये बदल होत आहे. त्याची गांभिर्याने दखल घेण्याची गरज असून त्यावर संशोधन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मॉन्सूनचा अभ्यास केला पाहिजे.

भारतीय हवामान सोसायटीचे माजी अध्यक्ष जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले की, दरडी कोसळण्याचे पूर्व अनुमान देण्याची प्रणाली विकसित केली आहे. ती वापरून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा अंदाज दिला जातो. त्यामुळे जीवितहानी व वित्तहानी कमी झाली आहे. मागील चार ते पाच वर्षात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत.

चालू वर्षी लहान मोठ्या पंधरा ते वीस दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी दरड ही केरळमधील वायनाड येथे झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. कार्यशाळेत भारतीय हवामान संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. सोसायटीचे सचिव डॉ. सबीन टीपी यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com