Radhanagari Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Kolhapur Rain Update : सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सोडला जात आहे. यामुळे भोगावती नदीसह पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने, पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता. २५ ) रात्रीपासून धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली आणि शनिवारी (ता. २६) पहाटेपर्यंत चार दरवाजे खुले झाले आहेत.

सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सोडला जात आहे. यामुळे भोगावती नदीसह पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. वारणा धरणांतून १० हजार २६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी दुपारपर्यंत विविध नद्यांवरील ४५ बंधारे पाण्याखाली गेले.

गेल्या चार दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शहरात हलक्या सरी कोसळल्या, तर गेल्या चोवीस धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात तब्बल अडीच फूट वाढ झाली. दरम्यान, अद्याप आठ बंधारे पाण्याखाली आहेत. शुक्रवारी रात्रीपासून अचानक पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळल्या.

धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली. यामध्ये कुंभी, घटप्रभा, पाटगाव, कासारी, धामणी, कोदे आदी धरण क्षेत्रांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सकाळी १८ फूट असणारी पंचगंगेची पाणी पातळी रात्री २८ फूट सहा इंचांवर पोहोचली.

आलमट्टी धरण ८०.९३ टक्के धरण भरले असून, त्यातून ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर कोयना धरण ७२.८१ टक्के भरले असून, २० हजार ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसामुळे एका घराची भिंत कोसळून ३० हजारांचे नुकसान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४१४ मालमत्तांचे सुमारे एक कोटी ५१ लाख १५ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT