Radhanagari Sanctuary agrowon
ॲग्रो विशेष

Radhanagari Sanctuary : राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

Dajipur Wildlife Sanctuary : राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्य यंदाच्या पर्यटन हंगामात उद्या १ नोव्हेंबर पर्यटकांसाठी खुले होणार आहे.

sandeep Shirguppe

Dajipur Wildlife Sanctuary : राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्य यंदाच्या पर्यटन हंगामात उद्या १ नोव्हेंबर पर्यटकांसाठी खुले होणार आहे. याबाबत दाजीपूर वन्यजीन अधिकारी अजय माळी यांनी माहिती दिली. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्याने पाच महिने जंगल सफारी बंद करण्यात आली होती.

उद्या १ नोव्हेंबरपासून जंगल सफारीसह राहण्याची सोय सुरू होणार असल्याने पर्यटन हंगामाच्या चाहूलने दाजीपूर अभयारण्य गजबजणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटकांसाठी डॉरमेटरी तंबू निवास अम्पीथिएटर, मोक्याच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे, फुलपाखरू उद्यान, जैवविविधता पशुपक्षीविषयक माहिती केंद्र आदी सुविधा मिळणार आहेत. यामुळे अभयारण्य पाहण्यासाठी वर्षाला पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने पर्यटन व्यवसायालाही बरकत येणार आहे.

ग्राम परिस्थितीकीय समितीच्या नियंत्रणाखाली भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे सुरक्षित 'जंगल सफारी' व्यवस्था निर्माण झाली आहे. सध्या तस जिसी जंगल सफारीसाठी तैनात आहेत. जंगल सफारी वाहन व्यवस्थेतून वन्यजीव विभागाने स्थानिकांना रोजगारासाठी नवीन संधीच मिळवून दिली आहे.

पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांना प्राधान्य आणि ग्राम परिस्थितीकीय विकास समितीमार्फत पर्यटन व्यवस्थापन यंदाच्या पर्यटन हंगामाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. अभयारण्य क्षेत्रात ठक्याचा वाडा येथे आणखी चार नवीन तंबू निवासाची सोया केली आहे. पर्यटकांसाठी दहा ते निवास उपलब्ध झाले आहेत. लवकरच दाजीपूरातील एमटीडीसीचे सर्व सुविधायुक्त अद्यावत 'हॉलिडे रिसॉर्ट' पर्यटकांसाठी खुले होतील.

हे रिसॉर्ट पर्यटन विकास आणि पर्यटन सुविधांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास आणि भोजन व्यवस्था मिळण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. भविष्यात नवे उपक्रम आणि निसर्ग पर्यटनात स्थानिकांचा सहभाग वाढीवर भर राहील असे दाजीपूरचे वन्यजीव अधिकारी अजय माळी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Administration Plan: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज

Paddy Prices Drop: मळणीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचा डाव

Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’ला पाठिंबा, पण मोबदला दहा पट द्या !

Kharif Sowing Planning: वर्ध्यात ४.१९ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

Shirapur Irrigation Project: शिरापूर योजनेच्या कामाची गती संथ

SCROLL FOR NEXT