Team Agrowon
जून महिना उलटला तरी अद्यापही राज्यात मॉन्सूचा पाऊस बरसला नाही. लांबलेल्या पावसामुळे अनेक धरणातील पाणी पातळी घटली आहे.
कोल्हापुरातील राधानगरी धरणाची पाणी पातळी झापाट्याने कमी होत आहे. धरणातील घटलेल्या पाणी पातळीमुळे धरणाच्या पोटात गडप झालेल्या वास्तू आता बाहेर डाकोवू लागल्या आहेत.
राधानगरी धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने धरणाच्या मध्यभागी असलेला शाहूकालीन 'बेनझिर व्हिला' उघड्यावर पडला आहे.
यापूर्वी २०१६ आणि २०२१९ मध्ये धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे 'बेनझिर व्हिला' उघड्यावर आला होता. त्यानंतर आता तब्बल चार वर्षांनी पुन्हा हा व्हिला पर्यटकांसाठी खुला झाला आहे.
राधानगरी धरणाच्या बांधकामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत. तसेच धरणाच्या बांधकामावर प्रत्यक्ष लक्ष ठेवता यावे, या उद्देशाने राजश्री शाहू महाराजांनी हा व्हिला बांधला होता.
राधानगरी धरणाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर ही दगडी वास्तू उभारण्यात आली होती. धरणाच्या कामावर देखरेखीसाठी स्वत: शाहू महाराजांचे वास्तव्य या वास्तूत होते.
दगडी बांधकाम असलेल्या या वास्तूला 'बेनझिर व्हिला' असे नाव देण्यात आले होते. दरम्यान, वास्तूची सध्याची स्थिती अत्यंत बिकट असून वास्तू झाडाझुडपांनी वेढलेली आहे.